..म्हणून संजय दत्तवर भयंकर चिडले होते सुनील दत्त; घर सोडून जाण्याची दिली धमकी

संजय दत्तला त्याच्या कॉलेजच्या दिवसांपासूनच नशेची सवय होती. तो खुप मोठ्या प्रमाणावर नशा करायचा. त्याच्या या सवयीमूळे त्याला बॉलीवूडमध्ये करिअर करणे देखील कठिण झाले होते. त्याला अनेक चित्रपटांमधून काढून टाकण्यात आले होते. त्याचे करिअर खराब होत होते.

संजय दत्तच्या ड्रग्जच्या सवयीला त्याच्या आई नर्गिस खुप जास्त कंटाळल्या होत्या. त्या संजयला अशा अवस्थेत बघू शकत नव्हत्या. पण संजयला मात्र नशेशिवाय राहता येत नव्हते. हळूहळू संजयचे जीवन नशेमध्ये गुंतूण गेले. त्याला नशेशिवाय जगता येत नव्हते.

संजय दत्त नशेत एवढा धुंद असायचा की, ज्यावेळी त्याच्या आईचा मृत्यू झाला होता. त्यावेळी त्याच्या डोळ्यांतून एक थेंब अश्रू देखील पडला नव्हता. हे सगळं काही पाहून सुनिल दत्त खुप जास्त चिडले होते. त्यांनी संजयला ओढत नर्गिसच्या अंतिम यात्रेत नेले होते.

१९८१ मध्ये संजय दत्तने ‘रॉकी’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये डेब्यू केला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच यशस्वी झाला होता. पण संजयला त्याच्या नशेच्या सवयीमूळे बॉलीवूडमध्ये काम मिळणे कठीण झाले होते. रॉकी चित्रपटानंतर त्याला चित्रपटांच्या ऑफर येत नव्हत्या.

‘रॉकी’ चित्रपटाची निर्मिती सुनील दत्तने केली होती. त्यामूळे ते संजयचे सगळे नखरे सहन करायचे. त्याचा पहीला चित्रपट हिट झाला होता. पण संजयची आई नर्गिस त्याच्या वाईट सवयींमूळे खुप जास्त वैतागल्या होत्या. त्यांना संजयला सुधरवायचे होते. त्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले.

नशेसोबतच संजयला पोरींचीसुद्धा सवय होती. एक नाही तर अनेक गर्लफ्रेंड्ससोबत त्याचे अफेअर होते. कॉलेजच्या दिवसांपासूनच संजयचे अनेक मुलींसोबत अफेअर होते. त्यामूळे सुनील दत्त नेहमीच त्याच्यावर चिडायचे.

संजय दत्त चित्रपटांमध्ये आले त्यावेळी देखील तो वाईट सवयी सोडत नव्हता. रॉकी चित्रपटाच्या शुटींग वेळी संजय टिना मुनीमच्या प्रेमात पागल झाले होते. त्यामूळे ते सेटवर उशिरा यायचे किंवा यायचेच नाही.

सुनील संजयच्या या सवयीला खुप जास्त वैतागले होते. एक दिवस संजयची वाट बघून बघून सुनील दत्त एकटे घरी निघून आले. संजयच्या सवयींमूळे शुटींगमध्ये अडचणी येत होत्या. त्यामूळे सुनीलने संजयला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला.

सुनील दत्त घरी गेले आणि संजयची वाट बघत बसले. पण संजय रात्रभर घरी आलाच नाही. सुनील दत्त खुप जास्त चिडले. सकाळपर्यंत ते संजयची वाट बघत बसले. सुनील दत्तचा राग बघून नर्गिसने त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केले.

पण सुनील दत्तने त्यांना शांत राहण्यास सांगितले. जर त्या दोघांच्या भांडणात आल्या तर त्यांना मुलगा किंवा वडील दोघांपैकी एकाला निवडावे लागेल. हे ऐकताच नर्गिस खुप घाबरल्या. त्यांना ही गोष्ट मान्य नव्हती.

सुनील दत्तने सांगितल्यानंतरही त्या दोघा भांडणात आल्या आणि त्यांनी संजयला वाचवण्याचा प्रयत्न केला. हे बघताच सुनील दत्त चिडले आणि त्यांनी घर सोडून जाण्याचा निर्णय घेतला. चिडलेले सुनील दत्त शेवटी घर सोडून गेले.

त्यांनी संजयला सांगितले की, जोपर्यंत तो टिनाला सोडणार नाही. तोपर्यंत ते घरात येणार नाहीत. पण तरीही संजयने काहीही ऐकले नाही. दोन दिवस बाहेर राहिल्यानंतर सुनील दत्त घरी परत आले. यावेळेसही सुनील आणि संजय दत्तची भांडण नर्गिसने सोडवली होती.

नर्गिस संजय दत्तवर नेहमी लक्ष ठेवायच्या. त्या संजयला कामाशिवाय घराबाहेर जाऊ द्यायच्या नाहीत. पण संजय मात्र ऐकत नव्हता. तो घरातच मित्रांना बोलवायचा आणि नशा करायचा. याच कालावधीमध्ये नर्गिसला कॅन्सर झाला. त्यामूळे त्यांचे संजयकडे दुलर्क्ष झाले.

महत्वाच्या बातम्या –
११ अफेअर्सनंतर २०१० मध्ये मनीषा कोईरालाने केले होते नेपाली बिजनेस मॅनसोबत लग्न; दोन वर्षात झाले वेगळे
आयूष्यभर भाड्याच्या घरात राहत होत्या प्रसिद्ध अभिनेत्री दिना पाठक; टेलरसोबत केले होते लग्न
एकेकाळी खुप गरीब होते अनिल कपूर; अनेक दिवस राज कपूरच्या गॅरेजमध्ये राहत होते अनिल कपूरचे सगळे कुटूंब
मिथून चक्रवर्तीच्या एका चुकीमूळे ऋषी कपूरला गमवावा लागला असता जीव पण…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.