पोल्ट्री व्यावसायिकांना दिलासा! ‘बर्ड फ्लू’साठी मिळणार मदत, वाचा काय म्हणाले मंत्री…

मुंबई | राज्य अगोदरच कोरोनच्या संकटाशी सामना करत आहे, अशातच आता नवीन संकट उभं राहिलंय, ते बर्ड फ्लूच्या रूपात.  खबरदारी म्हणून पशुसंवर्धन विभागाकडून बाधित पक्ष्यांची शास्त्रोक्‍त पध्दतीने विल्हेवाट लावण्यात येत आहे. यामुळे नुकसान होणाऱ्या पशुपालकांसह शेतकऱ्यांना केंद्र व राज्य शासनाच्या निधीतून मदतीचा निर्णय घेण्यात आला आहे.

केंद्र व राज्य शासनाच्या प्रत्येकी ५० टक्‍के निधीतून यासाठी तरतूद केल्याची माहिती पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी दिली. त्यासंदर्भातील आदेश बुधवारी काढण्यात आले. त्यामुळे बाधित क्षेत्रातील पशुपालकांना अल्पसा दिलासा मिळण्यास मदत होणार आहे.

या आदेशानुसार पक्ष्यांची विल्हेवाट लावली जात असल्याने पशुपालक तसेच शेतकऱ्यांचे नुकसान होते. त्यांना अल्पसा आधार म्हणून केंद्र व राज्य शासनाच्या योजनेतून प्रत्येकी ५० टक्‍के प्रमाणे निधीची तरतूद करीत भरपाई देण्यात येणार आहे.

अंडी, चिकन खाणाऱ्यांना पशूसंवर्धनमंत्र्यांनी दिला ‘हा’ सल्ला…
चिकन, अंडी खाणार असाल तर 70 डिग्री सेल्सिअस तापमानावर अर्धा तास चिकन, अंडी शिजवा आणि मगच खा, असा सल्ला राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी राज्यातील जनतेला दिला.

ते म्हणतात, ‘अंडी किंवा कोंबडी यांना आपण विशिष्ट तापमाणावर अर्धातास जर शिजवलं, तर त्यातील जीवाणू मरून जातो. हे शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झालेलं आहे. म्हणून जनेतला एवढंच सांगणं आहे की, अंडी किंवा चिकन अर्धा तास ७० डिग्री अंशावर शिजवलं पाहिजे. असे केल्यास त्यामधील जीवाणू मरून जातात, जे तुमच्यासाठी सुरक्षित असेल.’

दरम्यान, कोरोना संकटाच्या काळात चिकनमधून कोरोना होत असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. मात्र बर्ड फ्ल्यूबाबतच्या चुकीच्या अफवा पसरवून पोल्ट्री व्यवसाय अडचणीत आणण्याचा प्रयत्न कुणीही करू नये. अशा प्रकारच्या अफवा पसरविणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.

महत्त्वाच्या बातम्या
शेतकरी आंदोलनाला लागलेल्या हिंसक वळणावर शरद पवारांचे मोठे विधान, म्हणाले…
बलात्का.राची तक्रार मागे घेतल्यानंतर धनंजय मुंडे भावूक, म्हणाले…
…तर दिल्लीतील हिंसा रोखता आली असती; संजय राऊतांनी केले मोठे विधान

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.