‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेच्या टीमने कोकणवासियांसाठी केली कळकळीची विनंती; व्हिडिओ पाहून येईल डोळ्यात पाणी

कोकणात ढगफुटीसारखा पाऊस झाल्याने शेकडो घरं पाण्याखाली गेली आणि मोठ्या संख्येने लोक अडकले. महामार्ग आणि कोकण रेल्वे सुद्धा ठप्प झाली आणि त्यामुळे मदत कार्यात मोठा अडथळा निर्माण झाला. अनेकांचे संसार विस्कळीत झाले आहेत.

जुलै महिन्याच्या सुरुवातीच्या काळात रत्नागिरी जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पूर येईल असा अंदाज वर्तवण्यात आला होता आणि या भागाचा समावेश रेड झोनमध्ये केला गेला. तेव्हा एनडीआरएफ टीम कोकणात सज्ज होती. पण आताच्या पावसावेळी ढगफुटीचा किंवा पुराचा कोणताही इशारा देण्यात आला नाही आणि प्रशासनाची सुद्धा तयारी दिसली नाही असंही स्थानिकांचं म्हणणं आहे.

कोकणातील या पूर परिस्थितीचा आढावा घेतला असता स्थानिक लोकांचे प्रचंड नुकसान झाले आहेत. गेल्या काही काळातील अतिवृष्टी आणि इतर नैसर्गिक आपत्ती पाहिल्यास काही मोजक्या तालुक्यांना याचा सर्वाधिक थेट फटका बसत असल्याचं दिसतं. त्यात चिपळूण, खेड, संगमेश्वर असे तीन ते चार तालुके आहेत. वर्षांनुवर्षं कुठे पाणी भरतं हे सुद्धा उघड आहे. त्यामुळे त्यादृष्टीने नियोजन व्हायला हवे अशीही मागणी आहे.

या पूर परिस्थितीचा आढवा घेता अनेकांनी मदतीचा हात पुढे केला आहे. यामध्ये सामान्यांपासून ते अनेक कलाकारांचा देखील समावेश आहे. तसेच इतक्यातच हाती आलेल्या व्हिडिओनुसार मराठी टेलिव्हिजनवरील ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेतील सर्व कलाकारांनी कोकणवासियांना मदत देऊ केली आहे.

तसेच ‘सुंदरा मनामध्ये भरली’ च्या संपूर्ण टीमने एक व्हिडिओ शेअर करत सर्वाना मदत करण्याच आव्हान देखील केल आहे. त्यामध्ये कलाकारांनी पैसे असतील तर पैशांची मदत करा किव्हा जमेल तसं जीवनावश्यक गोष्टींची मदत करण्याची कळकळीची विनंती केली आहे. कोकणवासियांना या परिस्थितीतून सावरण्यासाठी आपण सर्वांनी मदत करणे खूप गरजेचे आहे.

हे ही वाचा-

चार्जिंगच नो टेन्शन! फक्त १० मिनिटांत फुल चार्ज होणार इलेक्ट्रिक कार, चार्ज केल्यावर चालणार १००० किमी\

असला जावई नको ग बाई! राग आला म्हणून जावई सासुरवाडीत आला अन् थेट विजेच्या टॉवरवर जाऊन बसला

धक्कादायक! बकरीवर ५ लोकांनी केला सामूहिक बलात्कार; इमरान खान झाले ट्रोल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.