सुमोना चक्रवर्ती कपिल शर्माला घालायाची शिव्या; म्हणाली, पैशांसाठी सगळं सहन करत होते

मुंबई । ‘द कपिल शर्मा शो’ हा सर्वांचा आवडता कॉमेडी शो. अगदी काही वर्षांमध्येच हा शो घराघरात पोहोचला. यामध्ये काम करणारी सुमोना चक्रवर्ती आज छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. मात्र तिने आता धक्कादायक खुलासे केले आहेत.

तिला खरी ओळख मिळाली ती द कपिल शर्मा शोमुळे. परंतु या शोमध्ये काम करताना ती फारशी खुश नव्हती. तिला प्रसिद्धी आणि पैसे मिळत होते. परंतु कपिलच्या विनोदांमुळे तिचा आत्मसन्मान मात्र सातत्याने दुखावला जात होता. सर्वांसमोर कपिल हा तिला काहीही बोलत असत.

यामुळे वैतागलेली सुमोना मनातल्या मनात कपिलला शिव्या घालून आपला राग व्यक्त करायची. याबाबत तिने खुलासा केला आहे. तिने अभिनेता राजीव खंडेलवाल याला दिलेल्या मुलाखातीत आपल्या करिअरवर भाष्य केले होते. यावेळी तिने अनेक खुलासे केले होते.

कपिल शर्मा अनेकदा तुझ्या शरीरावर विनोद करायचा. तुझे ओठ बदकासारखे आहेत अशी खिल्ली उडवायचा. त्यावेळी तुला कसे वाटायचे? असा सवाल राजीवने सुमोनाला केला. यावर तिने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

ती म्हणाली, सुरुवातीला मला खूप वाईट वाटायचे. मी एकटी असताना यावर विचार देखील करायचे. अशा प्रकारच्या विनोदांमुळे माझा आत्मसन्मान दुखावला जात होता. मग मी अशा वेळी कपिल शर्माला मनातल्या मनात शिव्या घालून आपला राग व्यक्त करायचे. असे ती म्हणाली.

त्यामुळे माझी घुसमट व्हायची नाही. कालांतराने मला याची सवय झाली. कदाचित मला त्याचेच पैसे मिळत होते. त्यामुळे मी याबाबत तक्रार केली नाही. याला बॉडी शेमिंग म्हणायचे की नाही? या बाबत आजही माझा गोंधळ आहे. त्यामुळे याबाबत मी विचार करणे आता थांबवले आहे, असेही ती म्हणाली.

ताज्या बातम्या

देशी जुगाड! शेतकऱ्याने ‘या’ पद्धतीने साठवला कांदा, दोन वर्ष जसाच्या तसा राहिला कांदा; पहा साठवण्याची पद्धत

जेवणानंतर ‘हा’ घरघुती उपाय करा, कधीच गॅस आणि पित्त होणार नाही

मोठी बातमी! राजकारणात हालचालींना वेग, नाना पटोलेंना तातडीने दिल्लीत दाखल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.