पाटबंधारे विभागात काम करणाऱ्या रुक्मीनी सुतार कशा झाल्या देवमाणूस मालिकेतील सरूआज्जी; वाचा..

‘ जुनं ते सोन’ अस म्हणतात ना तेच खर. पूर्वीची लोक खूपच प्रेमळ होती. ती आपली मत म्हणींच्या माध्यमातून मांडत असे. त्यात कधी प्रेमळ भावना तर कधी उपरोधिक भावना असतात. आता ह्या म्हणी जणू लोभ पावल्या आहेत. पण काही चित्रपटातुन आणि मालिकांच्या माध्यमातून ह्या म्हणींचा उल्लेख आपल्या कानी पडत असतात.

‘देण ना घेण आणि गावभर फिरून येण’, ‘चेहरा भोला नी भानगडी सोळा’  अश्या अनेक म्हणींचा डंका आपल्याला ‘देवमाणूस’ मालिकेत सरू आजीच्या माध्यमातून ऐकायला मिळाल्या. या मालिकेत असणारे पात्र सरू आज्जी त्यांच्या म्हणीमुळे  सध्या सोशलमीडियावर चांगलीच धुमाकूळ घालताना पाहायला मिळते.

झी मराठी वरील मालिका देवमाणूस मालिकेतील सरू आज्जीची भूमिका करणारी जेष्ठ अभिनेत्री रुख्मिणी सुतार सध्या ७२ वर्षांच्या आहेत, त्यांनी आत्तापर्यंत खूप साऱ्या मालीकांबरोबेर चित्रपटांत देखील काम केलं आहे. रुख्मिणी सुतार यांनी रिटायर्ड होई पर्यंत इर्रीगेशन मध्ये सर्विस केली आणि त्यानंतर त्या अभिनय क्षेत्राकडे वळल्या.

त्या गेल्या दहा-बारा वर्षापासून अभिनय क्षेत्रात काम करत आहेत. त्यांची अभिनयातील सरू आजी ही भूमिका प्रेक्षकांना प्रचंड प्रमाणात आवडली.  त्यांनी याआधी मिसेस मुख्यमंत्री, लागीर झाल जी, दुर्वा अश्या अनेक मालिकांमध्ये काम केल. तसेच त्यांनी सख्खा भाऊ पक्का वैरी, बघतोस की मुजरा कर, पहिली शेर दुसरी सव्वा शेर अश्या गाजलेल्या मराठी चित्रपटात देखील कामे केली.

सिंचन विभागात काम करत असताना त्या सुट्टीच्या दिवशी कुटुंबाला आणि नवऱ्याला न सांगता नाटकात काम करायच्या. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, रुख्मिणी  यांनी ‘लक्ष्मीकांत बेर्डे’ यांच्या सोबत नाटकात काम केले होते. नोकरी करत असताना देखील त्यांची अभिनयासाठी धडपड चालू होती.

ह्या लोकप्रिय आज्जीने बॉलीवूड मध्ये देखील काम केल आहे. तिने सलमान खानसोबत ‘दबंग’ चित्रपटात काम केलेलं पाहायला मिळत. एका मुलाखतीत सरू आज्जीने महानायक अमिताभ बच्चन यांच्या सोबत काम करायची इच्छा व्यक्त केली आहे. तसेच कितीही वय झाले तरी माझ्या कामात इतकीच एनर्जी असेल असेही त्या बोलतात. आजींच्या नावाजलेल्या म्हणींचे अनेक अभिनेत्यांनी व्हिडीओ बनवलेले पाहायला मिळतात.

हे ही वाचा-

देशसेवा करणाऱ्या माजी सैनिकांवर आली भयानक वेळ; कोरोनाच्या उपचारासाठी मिळत नाहीये आरोग्य सुविधा

“राज ठाकरे म्हणजे राजकारण न करता महाराष्ट्राच्या जनतेच्या मागे उभा असलेला एकमेव राजा

माणूस”रंग माझा वेगळा मालिकेतील श्वेताचा खेळ खल्लास; अखेर सत्याचाच होणार विजय

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.