२०० कोटींची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली सुकेश चंद्रशेखर( Sukesh Chandrshekhar) सध्या तिहार(Tihar) तुरुंगात आहे. पण अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस(Jacklin Fernandies) आणि सुकेश चंद्रशेखर यांच्या नात्याबद्दल दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. आतापर्यंत या प्रकरणात सुकेशने जॅकलीनला महागडे गिफ्ट दिल्याची चर्चा होती, पण आता या दोघांचे काही खाजगी फोटो समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यामुळे दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याचे उघड झाले आहे.(Sukesh chndrashekhar wrote letter from tihar jail)
या फोटोंवर तुरुंगात असणाऱ्या सुकेशने प्रतिक्रिया दिली आहे. सुकेशने तुरुंगातून एक पत्र लिहले आहे. माझे आणि जॅकलिनचे फोटो चुकीच्या पद्धतीने दाखवू नका, अशा शब्दात सुकेशने नाराजी व्यक्त केली आहे. हे पत्र सुकेश चंद्रशेखरने आपल्या वकीलांमार्फत प्रसिद्ध केले आहे. हे पत्र समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे.
सुकेश चंद्रशेखरचे बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन सोबतचे वैयक्तिक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या फोटोंवर सुकेश चंद्रशेखरने आपल्या वकिलांमार्फत पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे. सुकेश चंद्रशेखरने पत्रात लिहले आहे की, “हे खूप दुःखद आणि अस्वस्थ करणारं आहे. माझे आणि जॅकलिनचे वैयक्तिक फोटो समाज माध्यमांवर पसरवले गेले.”
“गेल्या आठवड्यात मला फोटोंबाबत बातम्यांवरून कळले. हे कोणाच्याही वैयक्तिक आयुष्याचे आणि गोपनीयतेचे उल्लंघन आहे”, असे सुकेश चंद्रशेखर याने पत्रात म्हंटले आहे. यासोबतच सुकेशने पत्रात आपले आणि जॅकलिनचे फोटो चुकीच्या पद्धतीने दाखवू नका, असे आवाहनही लोकांना केले आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात जॅकलिनचे नाव समोर आल्यानंतर तिला अनेकवेळा चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं.
सुकेशने पत्रात लिहिले की, “मी तुम्हाला विनंती करतो की जॅकलिनबाबत चुकीच्या बातम्या पसरवू नका. तिच्यासाठी हे सोपे नाही. जॅकलिनने माझ्यावर खूप प्रेम केले आहे. जॅकलीनचा मनी लाँड्रिंग प्रकरणाशी काहीही संबंध नाही. हे मी यापूर्वीच नमूद केले आहे. जॅकलीन आणि तिच्या कुटुंबासाठी मी जे काही केले, ते तिच्यावर प्रेम करणारा कोणताही व्यक्ती करेल.”
“मी आणि जॅकलीन रिलेशनशिपमध्ये होतो”, असा दावा सुकेश चंद्रशेखरने केला आहे. पण जॅकलीनने सुकेश सोबतचे नाते नाकारले आहे. जॅकलिनने या प्रकरणात पीडित असल्याचे सांगितले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुकेशने जॅकलिनला करोडोंच्या महागड्या गिफ्ट्स दिल्या होत्या. या प्रकरणात जॅकलिनसह नोरा फतेहीसारख्या अनेक अभिनेत्रींची नावे समोर आली आहेत.
महत्वाच्या बातम्या :-
मुंबईत पोलिसांनी उद्ध्वस्त केले मोठे सेक्स रॅकेट, जबरदस्तीने तरुणींच्या शरीराचा व्हायचा सौदा
चुकूनही करू नका ‘या’ चुका, रात्री गाडी चालवताना लक्षात ठेवा ‘या’ महत्त्वाच्या सेफ्टी टिप्स
वयाच्या 52 व्या वर्षी सलमान खानची ही अभिनेत्री झाली बोल्ड, स्विमींग पुलमधील फोटो झाले व्हायरल