सुजय विखेंना ‘तो’ गनिमी कावा येणार अंगलट.? हायकोर्टाने दिले कठोर आदेश

अहमदनगर । भाजपचे अहमदनगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील सध्या चांगलेच अडचणीत आले आहेत. रेमडेसीवीर इंजेक्शनचा तुटवडा भासू लागला असल्याने त्यांनी दिल्लीवरुन हे इंजेक्शन आणल्याप्रकरणी यांच्याविरोधात औरंगाबाद हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे.

सुजय विखे यांनी गनिमी कावा करून थेट दिल्लीवरुन रेमडिसिव्हर इंजेक्शनचा मोठा कोटा आणला होता. सुजय विखे यांनी खाजगी विमान करुन रेमडिसिव्हर इंजेक्शन अहमदनगरला आणली. त्यांनी स्वतः याबद्दल माहिती दिली होती.

काही दिवसांपूर्वी त्यांनी अहमदनगरमध्ये रेमडिसव्हीर इंजेक्शनचे वाटप केले होते. हे वाटप बेकायदेशीर आहे. वाटण्यात आलेली इंजेक्शन खरी होती की बोगस होती याबाबत काहीच माहीत नाही. त्यामुळे याबाबत तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी अरुण कडू आणि इतर तीन याचिकाकर्त्यांनी केली आहे.

यावेळी सुजय विखे यांनी ३०० इंजेक्शन आणली असल्याचा दावा केला गेला आहे. ही इंजेक्शन्स सर्व पक्षातील लोकांसाठी आहेत. कोणी याचे राजकारण करू नये, मी मुद्दाम दोन दिवस लेट हा व्हिडीओ अपलोड केला. नाहीतर माझ्यावर कारवाई झाली असती, असे सुजय विखे पाटील म्हणाले.

ही औषध तात्काळ ताब्यात घ्यावीत आणि त्याचं योग्यप्रकारे कायदेशीर गरजूंना वाटप करण्यात यावे अशी मागणी आता या याचिकेत केली आहे. तसेच राज्य सरकारला योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत.

यामुळे आता सुजय विखे यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. याबाबत आता २९ एप्रिलला सुनावणी होणार आहे. यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या

धक्कादायक! अभिनेत्रीनेच केली सख्य्या भावाची हत्या, मृतदेहाचे तुकडे करुन जंगलात फेकले

हिंदू महीलेला मुस्लीम तरूणांनी दिला खांदा; कोरोनाच्या भितीने पोटची पोरं जवळही आली नाहीत

टाटांनंतर आता रिलायन्सही आले मदतीला धावून, मुंबईत ८७५ ICU बेडची करणार सोय

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.