विधान परिषदेच्या निवडणुकीमुळे तर राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. परंतु त्यातही नाशिक पदवीधर निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे. डॉ. सुधीर तांबे यांनी शेवटच्या दिवशी अर्ज दाखल केला नाही. तर सत्यजित तांबे या यांनी अपक्ष अर्ज दाखल केल्यामुळे निलंबित केले आहे.
सत्यजित तांबे नाशिक पदवीधर निवडणुकीमुळे चांगलेच चर्चेचा विषय बनले आहेत. एका सभेत बोलतांना ते म्हणाले होते की, आमच्या संपूर्ण परिवाराला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यात आलं असा गंभीर आरोप त्यांनी केला होता.
सत्यजित तांबे हे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे भाचे आहेत. त्यामुळे याबाबत होणाऱ्या हालचालींवर सगळ्यांचेच लक्ष लागून आहे. निलंबनामुळे सत्यजित तांबे काही वेगळा निर्णय घेणार का? तसेच त्यांना भाजप पाठिंबा देईल का? असे प्रश्न निर्माण झालेले आहेत.
अशा सगळ्या शंका असतांनाच नगरचे खासदार सुजय विखे पाटील यांनी सत्यजित तांबे यांना एक सल्ला दिला आहे. शिवाजीराव कर्डिले साहेबांना येऊन भेट. सगळं होऊन जाईल, असा सल्ला भाजप खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी दिला आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील सोनईचे माजी आमदार चंद्रशेखर घुले यांची मुलगी आणि माजी मंत्री शंकरराव गडाख यांचा मुलगा या दोघांचा विवाह सोहळा काल पार पडला. त्याठिकाणी सुजय विखे पाटील यांनी उपस्थिती लावली असता, पत्रकारांशी संवाद साधला.
नाशिक पदवीधर निवडणुकीबद्दल बोलताना डॉ. सुजय विखे म्हणाले, “देवेंद्र फडणवीस साहेबांक कधी काय करतील हे कोणी सांगू शकत नाही. अपेक्षित काही वेगळं असतं आणि घडतं काही. हा त्यांचाच मास्टर स्ट्रोक आहे. यामागचे काय राजकारण आहे ते लवकरच सगळ्यांना कळेल.”
काँग्रेसला स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारण्याची सवय झाली आहे. भारत जोडो यात्रा जशी पुढे जाईल तसे तसे कार्यकर्ते काँग्रेस छोडो करतील, अशी टीका सुजय विखे पाटील यांनी काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर केली आहे.
महत्वाच्या बातम्या
तांबेंनी मौन सोडलं, काॅंग्रेसवर गंभीर आरोप करत म्हणाले; “आमच्या संपूर्ण परिवाराला आरोपीच्या पिंजऱ्यात…
निवडणूक आयोगाने काय त्यांच्या कानात…; सुषमा अंधारेंनी शिंदे गटाच्या आमदारांना झाप झाप झापले
पक्षाने निलंबीत करताच सुधीर तांबेंनी दिली पहीली प्रतिक्रीया; काॅंग्रेसलाच खडसावत म्हणाले…