सुजय विखेंची धाडसी मोहीम; नगरसाठी १० हजार रेमडिसीवीर स्वत: खाजगी विमानाने आणल्या

राज्यभरात कोरोनाच्या संकटाने थैमान घातले आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणेवर ताण आला आहे. त्यामुळे रुग्णालयामध्ये ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुडवडा निर्माण झाला आहे.

राज्यातील रेमडेसिवीरच्या इंजेक्शनवरुन सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षात वाद निर्माण झाला आहे. असे असताना अहमदनगरचे भाजप खासदार सुजय विखे पाटलांनी एक भन्नाट आयडीया लढवली आहे.

सुजय विखे यांनी रेमडेसिवीरचा मोठा साठा खाजगी विमानाने दिल्लीवरुन अहमदनगरला आणला आहे. सुजय विखे यांनी अहमदनगरच्या नागरीकांसाठी तब्बल १० हजार इंजेक्शन आणली आहे.

दोन दिवसांपुर्वीच हे काम सुजय विखे पाटलांनी हे काम केले होते, मात्र त्यांनी आज सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत ही माहिती दिली आहे. तसेच ही इंजेक्शन्स सर्व पक्षातील लोकांसाठी आहेत. कोणी याचे राजकारण करु नये. मी मुद्दाम दोन दिवस लेट हा व्हिडिओ अपलोड केला आहे, असेही सुजय विखे पाटील यांनी म्हटले आहे.

माझ्यापरीने जमेल ती मदत अहमदनगर जिल्ह्यासाठी मी करण्याचा प्रयत्न करतोय. तरुण मुलं आज तडफडत आहे. त्यामुळे यामध्ये राजकारण आणू नये. ज्यांनी मला खासदार केलं, निवडून दिलं, त्या लोकांसाठी मी माझ्यापरीने मदत करतोय.मी लोकांना माझ्या डोळ्यांसमोर पाहताना मी पाहू शकत नाही, असे सुजय विखे पाटील यांनी म्हटले आहे.

मी फॅक्टरीत गेलो, तिथे माझ्या मैत्री संबंधांचा वापर केला. त्यांची मदत घेतली आणि ही औषध घेतली. माझ्यावर कारवाई होईल की नाही मला माहित नाही. खाजगी विमानाने ही औषधं आणतोय. माझ्या मनात पाप नाहीये, त्यामुळे मी कारवाईला घाबरत नाही, असेही सुजय विखे पाटील यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

महाराष्ट्राच्या मदतीला धावला ‘या’ राज्याचा मुख्यमंत्री; राज्याला दिले ३०० व्हेंटीलेटर्स
जामखेडच्या डॉक्टरांचा नाद नाय! ना रेमडेसिवीर, ना महागडी औषधं, तरी कोरोना रुग्ण झटपट बरे
बिग ब्रेकींग! अनिल देशमुखांना अटक? १०० कोटींच्या खंडणी प्रकरणी सीबीआयने घेतलं ताब्यात

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.