सुजय विखे यांची न्यायालयाने केली कान उघडणी; मतदारसंघात रेमडीसिवीर आणल्याचे प्रकरण भोवणार

महाराष्ट्राबरोबर देशभरात पण कोरोनाचा उद्रेक होताना दिसून येत आहे. देशाच्या आरोग्य व्यवस्थेवर पण मोठ्या प्रमाणावर ताण येत असल्याचे दिसून आले आहे. ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शनचा सगळीकडेच तुटवडा जाणवताना दिसत आहे.

अहमदनगर दक्षिणचे खासदार सुजय विखे यांनी त्यांच्या मतदारसंघासाठी दिल्लीवरून रेमडीसीविर इंजेक्शन आणली होती. त्यानंतर सुजय विखे यांच्यावर औरंगाबाद खंडपीठात याचिका पण दाखल करण्यात आली होती. त्या याचिकेचा निकाल देताना न्यायालयाने सुजय विखे यांना फटकारले आहे.

औरंगाबाद खंडपीठात या याचिकेचा निकाल देताना न्यायालयाने म्हटले आहे, “एखादी चांगली गोष्ट करण्यासाठी गैरमार्गाचा वापर झाला असेल तर त्या कृतीमागचा हेतू हा कधीच शुद्ध राहत नाही, अशा शब्दात सुजय विखे यांना न्यायालयाने फटकारले आहे.

सुजय विखे यांच्या चार्टर्ड विमानात १५ बॉक्स होते आणि त्यामध्ये १२,०० इंजेक्शन आणल्याचे शिरीष गुप्ते यांनी न्यालयाला सांगितले आहे. नगरमधील एका डॉक्टरने पुण्यातील कंपनीकडे १७०० इंजेक्शन मागितले होते.

त्यातील त्या डॉक्टरला ५०० इंजेक्शन मिळाले होते आणि बाकीचे सुजय विखे यांनी चंदिगढ येथील कंपनीत जाऊन आणले. यासाठी डॉ. विखे पाटील फाउंडेशनकडून १८,१४,४०० रुपये देण्यात आल्याचे न्यायालयात सांगण्यात आले आहे.सुजय विखे यांना परस्पर इंजेक्शन आणण्याच्या कृतीवरून न्यालयाने खडे बोल सुनावले आहेत.

सुजय विखे यांच्या वतीने त्यांच्या वकिलांनी औरंगाबाद खंडपीठात युक्तिवाद करण्यात आला. सुजय विखे यांनी कोणतेही गुन्हेगारीचे काम केले नाही. रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा होता. लोकांना मदत करण्यासाठी त्यांनी इंजेक्शन आणली आणि ती त्यांच्यात वाटून टाकली असा युक्तिवाद न्यायालयात करण्यात आला. या खटल्याची पुढील सुनावणी ५ मेला होणार आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.