भाजप खासदाराच्या पत्नीवर भाजपच्याच कार्यकर्त्यांचा विटांनी हल्ला; पहा नेमका काय प्रकार..

 

पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणूकीचा तिसरा टप्पा रविवारी पार पडला आहे, आता पुढची मतदानाची तारीख जवळ आली असताना नेते प्रचारसभा घेताना मत मागण्यासाठी गावातील दौरा करत असल्याचे दिसून येत आहे, अशातच एक धक्कादायक घटना घडली आहे.

गावात दौरा करत असताना तृणमुल काँग्रेसच्या महिला नेत्याला गावकऱ्यांच्या रागाला सामोरे जावे लागले आहे. आरमबाग मतदारसंघातून टीएमसीच्या उमेदवार सुजाता मंडल यांना गावकऱ्यांनी काठीचा धाक दाखवून पळून लावले आहे. याचा एक व्हिडीओ सुद्धा व्हायरल झाला आहे.

या व्हिडिओमध्ये महिला नेता शेतातून पळत असताना दिसून येत आहे, त्यांच्यामागे काही गावकरी काठी घेऊन मागे लागले आहे. या घटनेवर प्रतिक्रिया देत, हे कट कारस्थान भाजपचे असल्याचे सुजाता यांनी म्हटले आहे.

काही लोक मास्क लावून आले होते, त्यांनीच माझ्यावर हल्ला केला. काहींनी तर विटांनी हल्ला सुद्धा केला, असे सुजाता मंडल यांनी म्हटले आहे. तसेच या घटनेच्या एक दिवसाच्या आधीच भाजपच्या काही गुडांनी महिला मतदारांना धमकावले होते, असेही सुजाता यांनी म्हटले आहे.

सुजाता मंडल यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर सुद्धा व्हायरल होत आहे. सुजाता मंडल या भाजप खासदार सौमित्र खान यांच्या पत्नी आहे, सुजाता यांची तृणमुल काँग्रेसमध्ये मजबूत पकड आहे.

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.