मोठी बातमी! आत्महत्येपूर्वी पूजा चव्हाण संजय राठोडांशी ९० मिनिटं बोलली, धक्कादायक माहिती उघड

पुणे । राज्यात पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण चांगलेच तापले आहे. आता तपासात याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामध्ये शिवसेना नेते माजी वनमंत्री संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला होता. आता पोलिसांना महत्त्वाचा पुरावा हाती लागला आहे.

पूजा चव्हाण या २२ वर्षीय तरुणीने आत्महत्या केली होती. यामध्ये संजय राठोड यांचे नाव पुढे येत आहे. त्यांनी अनेकदा एकमेकांना फोन केल्याची माहिती पुणे पोलिसांच्या तपासातून समोर आली आहे. आत्महत्या करण्याच्या चार-पाच दिवसांपूर्वी तरुणी आणि राठोड यांच्यात फोनवरून संभाषण झाले होते.

यामुळे एकच खळबळ उडाली आहे,
तरुणीच्या मोबाईलमधून पुरावे हाती लागले आहेत. तरुणीशी संभाषण झालेली व्यक्ती राठोडच असल्याची माहिती समोर येत आहे. तिने सर्व संभाषणं रेकॉर्ड केली आहेत. बंजारा भाषेत ही संभाषणं झाली आहेत. त्याचे भाषांतर करण्याचे काम सध्या सुरू आहे.

यामध्ये एक संवाद हा ९० मिनिटांचा आहे. बंजारा तरुणीने ७ फेब्रुवारीला तिने पुण्यात इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. यानंतर संजय राठोड अडचणीत सापडले. यामुळे त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला.

तिच्या मोबाईलमधील डेटा रिट्राईव्ह करण्यासाठी तो फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीला पाठवण्यात आला आहे. इंडियन एक्स्प्रेसने याबद्दल वृत्त दिले आहे. यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.

त्यांच्यावर आरोप झाल्यानंतर त्यांनी मोठे शक्तिप्रदर्शन केले होते. यावेळी त्यांनी कोरोनाचे सर्व नियम तोडले होते. यामुळे ते अधिकच चर्चेत आले होते. अखेर त्यांनी राजीनामा दिला होता.

ताज्या बातम्या

सात टाके पडल्यानंतरही मागे नाही हटला हा पठ्ठ्या, वर्ल्ड चॅम्पियन बॉक्सरशी नडला, पण…

पुजा चव्हाण प्रकरणी संजय राठोड अडचणीत?, पोलिसांच्या हाती लागला ‘हा’ महत्वाचा पुरावा

अनेक दिवसांच्या चर्चेनंतर अखेर ‘या’ दिवशी ‘देवमाणूस’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.