दोन्ही भावांचे एकाच मुलीवर जडले प्रेम; नंतर तिच्यासाठी दोघांनीही केली आत्महत्या

कोटा | अलीकडे आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. आता आणखी एक धक्कादायक प्रकार राजस्थानच्या बुंदी या जिल्ह्यातून समोर आला आहे. याठिकाणी दोन चुलत भावडांनी धावत्या ट्रेनसमोर उडी घेऊन आत्महत्या केली आहे.

आत्महत्या करणाऱ्या दोन भावांची नाव महेंद्र गुज्जर आणि देवराज गुज्जर अशी आहेत. दोघेही २३ वर्षांचे होते. रविवारी सकाळी त्यांनी ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, या दोन भावांनी आत्महत्या करण्यापुर्वी मोबाईलवर एक व्हिडीओ रेकॉर्ड केला असून त्यात मुलीसाठी योग्य जोडीदार शोधा आणि तिचे लग्न लावून द्या असे म्हटले आहे. याशिवाय पोलिसांना घटनास्थळी कोणतीही सुसाइड नोट सापडली नाही.

पोलिसांनी याप्रकरणी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही भावांच्या हातावर ‘आशा’ नाव लिहिण्यात आले होते. याशिवाय पोलिसांनी दोघांचेही फोन तपासले असता त्यामधील फोटो आणि इतर गोष्टींवरुन दोघेही एकाच मुलीच्या प्रेमात असल्याचे दिसत आहे.

या मुलीबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळाली नाही. मात्र या दोघांनी रेकॉर्ड केलेल्या व्हिडीओत आत्महत्येसाठी आमच्यावर कोणीही दबाव आणलेला नाही त्यासाठी कोणालाही जबाबदार धरू नये असे सांगितले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिसांकडून सुरु आहे.

महत्वाच्या बातम्या-
२७ वर्षीय महिला बालविकास अधिकारी तरूणीची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये म्हणाल्या….
सेक्स आयकॉन बोलणाऱ्या लोकांना श्रीदेवीने दिले होते ‘हे’ उत्तर; उत्तर ऐकून तुम्हाला गर्व वाटेल
आश्चर्यंम! बहाद्दरानं जुन्या साडीपासून २ मनिटात बनवली दोरी, व्हिडीओ पाहून थक्क व्हाल

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.