मुंबईत आणखी एका प्रसिद्ध अभिनेत्रीची आत्महत्या; समोर आले धक्कादायक कारण

मुंबई | सध्या बॉलीवूडमधील कलाकारांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढत चालले आहे. अनेक कलाकारांनी डिप्रेशनला कंटाळून आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे सिनेसृष्टीत खळबळ माजलेली आहे. आता पुन्हा एकदा एका अभिनेत्रीने आत्महत्या केली आहे. 

या अभिनेत्रीच्या तपासांतर्गत पोलिसांनी ३ जणांना अटक केली आहे. श्रवणी असे त्या अभिनेत्रीचे नाव आहे. श्रावणीच्या आईने याबाबत पोलिसांत तक्रार केल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामधून काही धक्कादायक माहिती समोर आली आहे.

पोलिसांना तपासात मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांना तपासातून मिळालेल्या माहितीनुसार, २६ वर्षांची श्रावणी हिचे टीवी अभिनेता देवराज रेड्डी (वय २४), अनंतपूर येथील व्यावसायिक साई कृष्ण रेड्डी (वय 28) आणि निर्माता अशोक रेड्डी या तीन व्यक्तींसोबत अफेअर होते.

त्यानुसार पोलिसांनी या तिघांना अटक केली आहे. साई कृष्ण रेड्डी यांच्यासोबत श्रावणीचे तीन वर्षे प्रेमसंबंध होते. यादरम्यान त्याने तिच्या कुटुंबाला आर्थिक मदतही केली होती. पण त्यांचे रिलेशन जास्त काळ टिकले नाही आणि २०१८ ला त्यांचे ब्रेकअप झाले.

नंतर देवराज आणि श्रावणीची भेट टिकटॉकवर झाली. तिने त्याच्यासाठी काही व्हीडिओसुद्धा केले होते. त्यानंतर त्यांच्यात जवळीक वाढली आणि याबद्दल श्रावणीच्या भावालाही माहीत होते. पण श्रावणीचं अशोर आणि साई या दोघांसोबत नातं असल्याचं देवराजला कळलं.

त्याने तिचा नंबर ब्लॉक केला आणि नाते संपवण्याचा विचार केला. श्रावणीने त्याला खूप समजवण्याचा प्रयत्न केला, पण देवराजने तिचे काहीही ऐकले नाही. फेब्रुवारीमध्ये देवराज आणि साई कृष्ण रेड्डी यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. त्यांच्यात हाणामारीही झाली होती.

श्रावणीला या सर्व गोष्टींचा खूप मानसिक त्रास होत होता. तिच्या मनावर खूप दबाव आला होता. त्यामुळे तिने टोकाचे पाऊल उचलले आणि ८ सप्टेंबरला आत्महत्या केली.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.