पती आशुतोष भाकरेच्या आत्महत्येनंतर वर्षभराने अभिनेत्री मयुरी देशमुखने सोडले मौन; म्हणाली…

गेल्यावर्षी मराठी अभिनेत्री मयुरी देशमुखच्या पतीने आत्महत्या केली. यामुळे तिला मोठा धक्का बसला आहे. मयुरी ही ‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेतून घराघरात पोहचलेली आहे. अनेक चाहते तिचे आहेत.

मयुरी सध्या स्टार प्लसवरील ‘इमली’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. तिचे पती अभिनेता म्हणजेच आशुतोष भाकरेने त्याच्या राहत्या घरी आत्महत्या केली होती. त्यावेळच्या परिस्थितीवर तिने आता भाष्य केले आहे.

एक वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत २०२० वर्ष कठीण होते. पण एका वेळेला मी ते पूर्ण वर्ष एका दिवसासारखे मानले. कारण मी ज्या गोष्टींचा सामना करत होतो त्यातून बाहेर पडण्यासाठी असे करने गरजेचे होते, असे मयुरीने म्हटले आहे.

तिच्यावर कोसळलेल्या या दुःखातून तिने स्वतःला सावरले आहे. आता तिने लिहलेले ‘डिअर आजो’ हे नाटक लवकरच विविध प्लॅटफॉर्मवर पाहण्याची संधी प्रेक्षकांना उपलब्ध होणार आहे.

तीन वर्षांपूर्वी मयुरीने हे नाटक लिहले होते. या नाटकात भारतातील आजोबा आणि अमेरिकेत वाढलेली नात यांच्यातील नातेसंबधावर तिने लिहिले आहे. लेखक म्हणून मयुरीचे हे पहिलेच नाटक आहे. यामुळे आता उत्सुकता लागली आहे.

पतीच्या निधनानंतरही ती खचून न जाता आता पुन्हा कामासाठी तयार झाली आहे. तिच्या चाहत्यांना आता ती कधी भेटीला येणार याकडे लक्ष लागले आहे. लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला ती येणार आहे.

ताज्या बातम्या

स्वत:च्याच लग्नात नवरी वाजवू लागली बेंजो, तुफान डान्सही केला; व्हिडीओ पाहून तुम्हीही नाचा

‘तुझ्यात जीव रंगला’मधील अभिनेत्रीने गुपचूप उरकला साखरपूडा; फोटो पाहून तुम्हाला बसेल धक्का

कोरोनाने मुलाला हिरावले; ही वेळ दुसऱ्यांवर येऊ नये म्हणून आईवडीलांनी तोडली १५ लाखांची एफडी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.