ब्रेकींग! मराठा आरक्षणासाठी आणखी एका तरुणाची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले,आरक्षण नाही म्हणून…

जालना । मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या तापला असताना एक धक्कादायक घटना घडली आहे. मराठा आरक्षणासाठी आणखी एका तरुणाने आत्महत्या केली आहे. यामुळे आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा पुढे आला आहे. आरक्षण मिळत नाही म्हणून एका तरुणाने गळफास घेवून आत्महत्या केली आहे. ही घटना जालना जिल्ह्यातल्या परतूर तालुक्यातील येणोरा गावात घडली आहे.

गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा विषय प्रलंबित आहे. यामुळे राज्यातील मराठा समाजातील तरुण हतबल झाले आहेत. केवळ आरक्षण नसल्याने आपल्याला डावलले जात असल्याची भावना त्यांच्यामध्ये निर्माण झाली आहे. आता या तरुणाने आत्महत्या केल्याने पुन्हा एकदा राज्यात खळबळ उडाली आहे.

केवळ २२ वर्षांच्या सदाशिव शिवाजी भुंबर या तरुणाने आत्महत्या केली आहे. आरक्षण नसल्याने जीवनयात्रा संपवतोय, अशी सुसाईड नोट लिहून त्याने आत्महत्या केली. त्याला आरक्षणामुळे पाहिजे ती नोकरी मिळत नव्हती. सदाशिव एका खाजगी कंपनीत नोकरीला होता.

तसेच शेतात ओला दुष्काळही आहे, यामुळे त्याने घरातील छताच्या पंख्याला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. यामुळे आता तरी याबाबत निर्णय होणार का? की अजून आत्महत्या होणार याकडे सरकारने लक्ष देणे गरजेचे आहे. अनेक तरुण आत्महत्या करत आहेत.

एकदाच आरक्षणाचा निकाल लावून टाका, अशी मागणी आता मराठा तरुण करत आहेत. हायकोर्टाने गेल्या काही दिवसांपूर्वी मराठा आरक्षण रद्द केले होते. यामुळे मराठा समाज नाराज झाला आहे. अनेक मोठे मोर्चे निघून देखील याबाबत निर्णय झाला नाही.

यासाठी खासदार संभाजीराजे यांनी राष्ट्रपतींची देखील भेट घेतली आहे. याबाबत निर्णय घेण्याची विनंती त्यांनी केली आहे. तुम्ही खचून जाऊ नका, निराश होऊ नका, असे सांगत खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा तरुणांना आवाहन केले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.