Suhana Khan Alibaug Land Purchase Case: बॉलिवूडचा किंग शाहरुख खान (Shah Rukh Khan actor) यांची एकुलती एक मुलगी सुहाना खान (Suhana Khan daughter) सध्या मोठ्या वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. साधारणपणे ती चित्रपटसृष्टीतील प्रोजेक्ट्समुळे चर्चेत असते, पण या वेळी कारण वेगळंच आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबाग (Alibaug Raigad town) भागात झालेल्या जमीन खरेदीमुळे तिच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे.
शेतकरी दाखवून जमीन खरेदीचा आरोप
महाराष्ट्र राज्यातील विद्यमान कायद्यानुसार, शेतीसाठी राखीव जमीन फक्त शेतकरीच खरेदी करू शकतो. मात्र सुहानानं स्वतःला शेतकरी दाखवत तब्बल 12 कोटी 91 लाख रुपयांना अलिबागमध्ये जमीन खरेदी केल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे हे प्रकरण अधिक गाजत असून चौकशीची प्रक्रिया सुरू आहे.
22 कोटींमध्ये घेतली जमिनी
मीडिया रिपोर्ट्सनुसार, या खरेदीत सुहानाला ‘शेतकरी’ म्हणून दाखवण्यात आलं होतं. प्रशासनाने हा व्यवहार संशयास्पद मानत चौकशीस सुरुवात केली आहे. 2023 मध्ये तिनं ही जमीन ‘देझा वू फार्म प्रायव्हेट लिमिटेड’ (Deja Vu Farm Pvt) या कंपनीच्या नावावर नोंदवली होती. एकूण व्यवहारात दोन जमिनींचा समावेश असून त्यांची किंमत जवळपास 22 कोटी रुपये होती.
शेतीसाठी राखीव जमिनीवर व्यवहार
ही जमीन अलिबागमधील थळ गावात (Thal village Alibaug) होती. सरकारने ही जमीन शेतीसाठी राखीव ठेवली होती. सुहानानं ही जमीन अंजली, रेखा आणि प्रिया या तीन बहिणींंकडून विकत घेतली होती. या बहिणींना ती जमीन वारसा हक्काने मिळाली होती. अशा जमिनीवर केवळ शेतकरीच व्यवहार करू शकतो, हे स्पष्ट नियम असूनही हा करार पार पडल्याने मोठं वादळ उठलं आहे.
स्टॅम्प ड्युटी भरूनही संशय कायम
या खरेदीवेळी सुहानानं तब्बल 77 लाख 46 हजार रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरली होती. मात्र, आता उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदारांकडून संपूर्ण चौकशीचे आदेश दिले गेले आहेत. जर आरोप सिद्ध झाले तर जमीन करार रद्द होण्याची शक्यता आहे किंवा मोठा दंडही भरावा लागू शकतो.