धाडस म्हणावं कि स्टंटबाजी! ऊसतोड मजुराने बिबट्याच्या बछड्यासोबत काढले सेल्फी

प्रसिद्धीसाठी कोण कुठल्या थराला जाईल याचा काही नेम नाही. सोशल मिडियावर सध्या लोकांच्या जीवाला गंभीर इजा पोहचवणाऱ्या प्राण्यांसोबत फोटेसेशन करण्याचा प्रकार घडत आहे. असाच एक प्रकार नाशिक जिल्ह्यातील निफाड तालूक्यात घडला आहे.

कुरूडगाव परिसरात ऊसतोडणी सुरू असताना मजुरांना बिबट्याचे बछडे ऊसात लपले असल्याचं दिसून आलं. त्यानंतर त्यांनी बछड्याला हातात घेऊन सेल्फी आणि व्हिडिओ काढले. त्यांचे धाडस अंगाशी येईल असं त्यांना वाटत नसल्याचं व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे.

 

दरम्यान, नाशिक परिसरात ऊसाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. बिबट्यांना ऊसाच्या शेतात राहण्यास आणि लपून बसण्यास मोठी जागा मिळते. त्यामुळे वारंवार ऊसाच्या शेतातच बिबट्या आढळून येतात. बछड्याच्या सेल्फिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर प्राणीप्रेमींनी याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
भारतातील कोणत्या राज्यात मुली सगळ्यात जास्त उंच असतात? आयएएस मुलाखतीत विचारलेला प्रश्न
अरे देवा! सारा मोठ्या भावाला तर जान्हवी छोट्या भावाला करत होती डेट; ‘या’ व्यक्तिमूळे झाले ब्रेकअप
झोपेत असलेल्या नवऱ्याला घातले मुलींचे कपडे आणि केला ‘हा’ विचित्र प्रकार, फोटो व्हायरल  

 

 

 

 

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.