कपिल शर्मा फेम सुगंधा मिश्रा आणि संकेत भोसलेवर पोलिसांनी केला गुन्हा दाखल; वाचा संपुर्ण प्रकरण

द कपिल शर्मा शो मधून प्रेक्षकांचे पोटभरून मनोरंजन करणारे अभिनेत्री सुगंधा मिश्रा आणि कॉमेडियन संकेत भोसले २६ एप्रिल रोजी लग्नाच्या बेडीत अडकले. मात्र लग्नानाच्या काही दिवसानंतरच पोलिसांनी या नव्या जोडीवर गुन्हा दाखल केला आहे.

सुगंधा आणि संकेतचा साखरपुडा आणि विवाह सोहळा जालंधरच्या कबाना कल्ब रिसॉर्टमध्ये पार पडला. मात्र या कार्यक्रमात कोरोना नियम पायदळी तुटवल्याचा आरोप सुगंधा मिश्रा आणि संकेत भोसले यांच्यावर करण्यात आला आहे.

पंजाबमध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे सरकारने २५ लोकांच्या उपस्थित विवाह सोहळा पार पाडण्याची नियमावली घातली होती. मात्र सुगंधा आणि संकेतच्या लग्नात १०० पेक्षा जास्त नातेवाईक  लोक उपस्थित होते.

लग्नाचे व्हिडिओ, फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले होते. यावरून फगवाडा पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तसेच रिसॉर्टवरही कारवाई करण्यात आली आहे. संकेत भोसले आणि सुगंधा मिश्रा या नव्या जोडीला धुमधडाक्यात लग्न करणं चांगलंच अंगलट आलं आहे.

मराठमोळा अभिनेता संकेत भोसले याच्यासोबत अभिनेत्री सुगंधा मिश्राचे प्रेमसंबंध असल्याचं समोर येत होतं.  सुगंधा मिश्रा आणि संकेतने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर प्रीवेडिंग फोटो शेअर केले होते आणि आपल्या प्रेमाची कबूली दिली. पोस्टमध्ये त्यांनी लग्नाची तारीख घोषित केली होती.

सुगंधा मिश्रा आणि संकेत भोसले हे दोघे कपिल शर्मा शो मध्ये काम करतात. संकेत आणि सुगंधाच्या प्रेमाची सुरूवात इथूनचं झाली. संकेत हा प्रसिध्द कॉमेडियन असून बॉलिवूड अभिनेता संजय दत्तची मिमिक्री करून प्रेक्षकांचे मनोरंजन करतो. त्यांच्या जोडीचा चाहतावर्गही मोठा आहे.

महत्वाच्या बातम्या-
कॉमेडी क्विन भारती सिंहची झाली फजिती; पहा व्हिडिओ
मुलींचे जीन्स घालणे धर्मेंद्रला नव्हते पसंत; धर्मेंद्र आल्यानंतर लगेच ड्रेस बदलत होत्या इशा आणि आहाना
अभिनेत्री मिताली मयेकरच्या आगळ्यावेगळ्या ‘मंगळसूत्रा’ची सर्वत्र चर्चा; पहा व्हायरल झालेले खास फोटो
‘दिलबर गर्ल’ नोरा फतेहीने हिंदी गाण्यावर केली भन्नाट लावणी; व्हिडिओ पाहून चाहते घायाळ

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.