‘राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मावळमध्ये शेतकऱ्यांवर गोळ्या घातल्या, दिल्लीतही तेच वातावरण तयार केलं’

मुंबई| काल प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीत शेतकऱ्यांनी आयोजित केलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागल्याने कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला गालबोट लागले आहे. दिल्लीतील हिंसाचारावरून भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहे.

याच पार्श्वभूमीवर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी राष्ट्रवादीला लक्ष केले आहे. ‘प्रजासत्ताक दिनी दिल्लीत शेतकरी आंदोलनादरम्यान गोळीबार व्हावा, असे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला गेला. गोळी चालवली असती तर पुन्हा हेच लोकं अन्नदाता शेतकऱ्यावर गोळी चालवली, असं बोलले असते,’ असे ते म्हणाले.

याचबरोबर पुढे बोलताना मुनगंटीवार म्हणाले, ‘याआधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी मावळमध्ये आंदोलक शेतकऱ्यांवर गोळ्या चालवल्या आणि किड्यामाकोड्या सारखे शेतकरी मेले”, असा गंभीर आरोप मुनगंटीवार यांनी केला.

दरम्यान, २०१९ मध्ये मावळ तालुक्यात पवना जलवाहिनी विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांकडून गोळीबार करण्यात आला होता. या प्रकरणावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते. अजित पवार यांनीच पोलिसांना आंदोलक शेतकऱ्यांवर गोळी चालवण्याचे आदेश दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता.

महत्त्वाच्या बातम्या
दिल्लीच्या घटनेमागे भाजपचाच हात; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याने केलेल्या आरोपाने उडाली खळबळ
शेतकरी आंदोलनात फूट! ट्रॅक्टर रॅलीतील हिंसाचारानंतर दोन शेतकरी नेत्यांनी घेतली माघार
पोलिसांना मारणाऱ्यांना शेतकरी म्हणायचं का?; निलेश राणेंचा संतप्त सवाल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.