गेल्या काही महिन्यांपासून नाशिक मतदार संघातील निवडणूकीच्या सर्वत्र चर्चा सुरू आहेत. सत्यजित तांबेंच्या एका निर्णयाने राजकीय वातावरणात चांगलीच खळबळ उडालेली आहे. महिनाभरापासून पदवीधर निवडणुकीच्या बाबतीत काही ना काही ऐकायला मिळत आहे.
इतक्या महिन्यांपासून या निवडणुकी दरम्यान घडत असलेल्या घटना, त्याची रंगत असणारी चर्चा अखेर थांबणार आहे. कारण या निवडणुकीचा निकाल अखेर काय तो लागणार आहे. या निकालासोबतच या चर्चेलाही कुठेतरी थांबा मिळेल असे म्हणता येईल.
याच दरम्यान सत्यजित तांबे यांचे निकटवर्ती असलेले मानस पगार यांच्या गाडीला अपघात झाला आहे. या अपघातामुळे सत्यजित तांबेंना मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे. सत्यजित तांबेंचे अतिशय जवळचे सहकारी म्हणून मानस पवार यांना ओळखले जाते. त्यांनी रावसाहेब दानवे यांच्या घरासमोर केलेल्या आंदोलनामुळे ते चर्चेत आले होते.
मानस पगार हे नाशिक ग्रामीण युवा काँग्रेसचे अध्यक्ष होते. तडफदार नेतृत्वामुळे त्यांना अध्यक्ष करण्यात आले होते. सत्यजित तांबेंचे जवळचे सहकारी म्हणून त्यांची ओळख आहे. नाशिक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निकालाच्याच दिवशी हा अपघात झाल्यने सत्यजित तांबेंना धक्का बसला आहे
निकालाच्याच दिवशी ही अतिशय दुःखद बातमी आली असे सत्यजित तांबेंनी म्हटले आहे. स्वतः सत्यजित तांबे यांनी ट्विट करत, मानस पगार या आपल्या जवळच्या सहकाऱ्याला श्रद्धांजली अर्पण केली आहे. माझा खंबीर पाठीराखा, सहकारी मित्र, नाशिक जिल्हा युवक कॉंग्रेस अध्यक्ष, मानस पगार याचे अपघाती निधन झाले. मन सुन्न करणारी ही बातमी आहे. निशब्द करणारी बातमी आहे, असे त्यांनी या ट्विट मध्ये म्हटले आहे.
बुधवारी रात्री उशिरा नाशिक-मुंबई महामार्गावरील कन्नमवार पुलाजवळ हा अपघात झाला आहे. समोरुन येणाऱ्या ट्रकने त्यांच्या कारला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की यात कारचा चेंदामेंदा झाला. गाडीच्या पुढील बाजुचा पूर्णपणे चुराडा झाला आहे. नाशिकमधील लोकमान्य रुग्णालयात दाखल केल्यानंतर तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
मानस पगारांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. सत्यजित तांबेचे वडील मत मोजणीच्या ठिकाणी न थांबता अंत्यसंस्कारासाठी गेले आहेत. दरम्याम मानस पवारांच्या निधनाने एक तरुण कार्यकर्ता राजकीय वर्तुळातून इतक्या लवकर निघून गेल्याच्या भावना व्यक्त केल्या जात आहेत. ते नाशिक जिल्ह्यातील लोकप्रिय तरुण होते.
महत्वाच्या बातम्या
विधानपरीषद निवडणुकीत फडणवीसांचा नवा डाव! सत्यजित तांबे नव्हे तर ‘या’ उमेदवाराला पाठिंबा देणार?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमुळे राष्ट्रवादीत उभी फुट; अजित पवारांसह बड्या नेत्यांची तातडीने धावाधाव
स्वतःच घर असल्यागत ४ वर्षे मॉलमध्ये राहिला, कुणाला कळलंही नाही; ‘ही’ एक चूक झाली अन् सगळंच उघडं पडलं