Sudhir Mungantivar : वेदांतानंतर आता राज्यातील वाघ देखील जाणार गुजरातला; मुनगंटीवारांनी जाहीर केला निर्णय

Sudhir Mungantivar : राज्यात शिंदे-फडणवीस हे नवे सरकार आल्यापासून अनेक नवनवीन निर्णय घेण्यात येत आहेत. यासोबतच वेगवेगळ्या योजनाही सुरु करण्यात येत आहेत. यातच भाजपचे नेते आणि राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी एक निर्णय घेतला आहे.

राज्यातील वाघाची जोडी गुरातला जात आहे. त्याबदल्यात राज्यात सिंहाची जोडी येणार असल्याची माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. याबाबत महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्ही राज्यांमध्ये करार झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. सुधीर मुनगंटीवार आणि गुजरातचे वन राज्यमंत्री जगदीश विश्वकर्मा यांच्यात याबाबत चर्चा झाली आहे.

यासंदर्भात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये व जुनागढ येथील सक्करबाग उद्यानाचे संचालक अभिषेक कुमार यांच्यात चर्चा झाली होती. सुनील लिमये यांच्या निर्देशानुसार अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉ. क्लेमंट बेन आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवलीचे संचालक जी. मल्लिकार्जुन यांनी गुजरातचे प्रधान मुख्य वनसंरक्षक यांच्याशी ४ एप्रिल २०२२ रोजी चर्चा केली होती. तसेच त्यांनी कार्यवाहीदेखील सुरु केली होती.

त्यानंतर २६ सप्टेंबरला सुधीर मुनगंटीवार आणि गुजरातचे वन राज्यमंत्री जगदीश विश्वकर्मा यांनी चर्चा केली. या प्रस्तावास केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरण यांच्याकडून मान्यता मिळ्वण्यासाठी एकत्र प्रयत्न करणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.

लवकरच बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात गुजरातमधील जुनागढ येथील सक्करबाग उद्यानातील सिंह आणि सिंहीणीची जोडी येणार असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले आहे. त्याच्या बदल्यात बोरिवलीतील वाघ आणि वाघिणीची जोडी गुजरातला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दक्षिण आफ्रिकेतून देशात चित्ते आणले होते. त्यानंतर आता राज्यात सिंह आणणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्याने राज्यातील वाद अजूनही संपलेला नाही. यातच आता परत राज्यातील वाघ गुजरातला जात असल्याने यावरून वाद निर्माण होईल का?, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

महत्वाच्या बातम्या
आता फोन उचलल्यावर हॅलो ऐवजी वंदे मातरम बोलायचं, सुधीर मुनगंटीवार यांचा मोठा निर्णय
अनुभवच नव्हता तर मुख्यमंत्री का झाले; सुधीर मुनगंटीवारांचा उद्धव ठाकरेंना उलट प्रश्न
मुंबईकर ऊठ, उघड तुझी मुठ आणि थांबव शिवसेनेची लूट’; सुधीर मुनगंटीवारांचा नवा नारा
Aditya Thackeray : आदित्य ठाकरे बोलले तुम्हाला लाज वाटली पाहिजे; भडकलेले मुनगंटीवार म्हणाले, आपल्या वडिलांना