“शिवसेनेच्या कोणत्याही मंत्र्याची नार्को टेस्ट करा, त्यातून फक्त एकच गोष्ट समोर येईल ती म्हणजे…”

महाविकास आघाडीमध्ये अजूनही काही कुरबूरी सुरु असल्याच्या दिसून येत आहे. शिवसेना नेते अंगत गीते यांनी दोन काँग्रेस एकविचाराची होऊ शकत नाही, तर शिवसेना काँग्रेस एकविचाराची कदापी होऊ शकत नाही, असे विधान खळबळजनक विधान केले आहे.

आता शिवसेना नेत्याच्या या वक्तव्यावरुन भाजप नेतेही महाविकास आघाडीवर निशाणा साधताना दिसून येतात. आता अंगत गीते यांच्या या विधानावरुन भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनीही महाविकास आघाडीवर टीका केली आहे.

शिवसेनेच्या कोणत्याही मंत्र्याची नार्को टेस्ट करा. त्यातून एकच आवाज बाहेर येईल, काँग्रेस-राष्ट्रवागीसोबत शिवसेनेने जाणं म्हणजे हे पॉलिटीकल सुसाईड आहे. ही युती नकोच असे म्हणत सुधीर मुनगंटीवर यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.

एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. महाविकास आघाडीसोबतच सुधीर मुनगंटीवारांनी शिवसेना नेते संजय संजय राऊतांवरही निशाणा साधला आहे. संजय राऊत हे शिवसेनेचे की राष्ट्रवादीचे, असे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

संजय राऊत हे शिवेसेनेचे की राष्ट्रवादीचे यावर पीएचडी करावी लागेल, जर त्यांचं भाष्य ऐकलं. म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कौतूक त्यांनी जेवढे केले, त्यापेक्षा जास्त कौतूक त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचे केले आहे, असे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

दरम्यान, अनंत गीते यांनी केलेल्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचा जन्म काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला असून शरद पवार आमचे नेते होऊच शकत नाही, असे अनंत गीते यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

आयकर विभागाच्या छाप्यानंतर सोनू सूदला नेटकऱ्यांनी धुतले, #Scamsood ट्रेंडींग
मुस्लिम कृष्णभक्तानं गायलं महाभारताचं टायटल सॉंग; गळ्यातून काढला शंखाचा आवाज, व्हिडीओ पाहून तुम्हीही कौतूक कराल
ठाकरे सरकारच्या मंत्र्यांना सळो की पळो करून सोडणाऱ्या सोमय्यांचे मुंबईत जंगी स्वागत

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.