तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यावरून विधानसभेत वाद, मुनगंटीवार आणि अजितदादा भिडले

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज तिथीनुसार शिवजयंती साजरी केली. यावरून विधानसभेत गदारोळ माजला आहे. भाजपचे(BJP) आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबतचा प्रश्न विधानसभेत उपस्थित केला. यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची चांगलीच दमछाक झाली आहे. यावेळी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारने तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्याबाबत भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली.(sudhir mungantivaar an ajit dada word war on shivajyanti)

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार शिवजयंती तिथीनुसार साजरी करण्याबाबतचा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला. यावेळी भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, “राज्याचे मुख्यमंत्री तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करत आहेत. मात्र राज्याचे अधिकारी १९ फेब्रुवारी म्हणजे तारखेनुसार शिवजयंती साजरी होणार असल्याचे म्हणत आहेत.”

शिवजयंती तिथीनुसार साजरी करण्यासंदर्भात विचार करण्यात यावा, अशी मागणी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी महाविकास आघाडी सरकारकडे केली. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “शिवजयंती साजरी करण्यावरून वाद घालू नये’, असे उपमुख्यमंत्री अजित पवार विधानसभेत म्हणाले.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले की, “याआधी आघाडी सरकारच्या काळात संशोधनानुसार छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्म दिनांक १९ फेब्रुवारी १६३० निश्चित करण्यात आली. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री किल्ले शिवनेरी येथे १९ फेब्रुवारी रोजी शासकीय कार्यक्रमात उपस्थित असतात”, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

“आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पक्षाचे प्रमुख म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले. त्यांच्यासह शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व इतर पक्षांच्या आमदारांनी देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले”, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सांगितले.

“विधिमंडळाच्या प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आहे. ज्यांना अभिवादनासाठी जायचे असेल त्यांनी जाऊन अभिवादन करावे”, असे देखील उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहेत. आज मुंबईतील शिवाजी पार्क येथे मनसेच्या वतीने शिवजयंतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या :-
रघुनाथ कुचिक प्रकरणातील पीडित तरुणीचे संजय राऊत आणि नीलम गोऱ्हे यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली…
”मी कडवा शिवसैनिक, ठाकरे कुटुंबाचा निष्ठावंत; शिवसैनिकच काँग्रेसचा आमदार निवडून आणतील”
प्रेमात पडलेल्या युवकालाही भविष्य स्थिर करण्याचा अधिकार; गुन्हा करणाऱ्या तरुणाला न्यायालयाने दिला जामीन