Sudarshan Ghule : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात न्यायालयात सुनावणी सुरू झाल्यानंतर आरोपींचे कबूलयांनी धक्कादायक खुलासे केले आहेत. आरोपी जयराम चाटे आणि महेश केदार यांच्या कबूल्यानंतर आता सुदर्शन घुलेचा सविस्तर जबाबही समोर आला आहे. घुलेने संतोष देशमुख यांचे अपहरण कसे केले आणि त्यावेळी काय घडले याची माहिती दिली आहे.
सुदर्शन घुलेने सांगितले की, सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करण्यासाठी दोन गाड्या वापरण्यात आल्या होत्या. त्यापैकी स्विफ्ट कार भाड्याने घेतली होती, जी अपहरणासाठी वापरली गेली. बीडच्या टोल नाक्यावर एक गाडी मागून आणि दुसरी गाडी समोर लावून अपहरणाची योजना रचली होती. अपहरण करतांना संतोष देशमुख यांना वायर, पाईप आणि लाकडी दांड्यांनी मारहाण केली गेली. घुलेने कबूल केले की, क्लच वायरने देखील मारहाण केली होती.
आरोपींच्या जबाबानुसार, 8 ऑक्टोबर 2024 रोजी बीडमधील जगमित्र कार्यालयात वाल्मिक कराड, विष्णू चाटे आणि आबादा कंपनीचे मॅनेजर थोपटे यांच्या उपस्थितीमध्ये एक मीटिंग झाली होती. यावेळी वाल्मिक कराडने दोघांना 2 कोटी रुपये देण्याची मागणी केली होती, अन्यथा त्यांच्या प्लांटला काम करण्यापासून थांबवले जाईल, अशी धमकी दिली होती. 29 नोव्हेंबर 2024 रोजी विष्णू चाटेने खंडणीसाठी फोन करून, डिमांड पूर्ण न केल्यामुळे शिंदे मॅनेजरला त्वरित प्लांटवर जाऊन समजावण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, सुदर्शन घुले आबादा कंपनीत जाऊन त्या संदर्भातील निरोप दिला.
पुन्हा 5 डिसेंबर 2024 रोजी विष्णू चाटेने फोन करून सुदर्शन घुलेला सांगितले की, डिमांड अद्याप पूर्ण झालेली नाही आणि काम सुरू केले नाही, त्यामुळे त्यांना धडा शिकवावा लागेल. त्यानुसार, 6 डिसेंबर 2024 रोजी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, आणि प्रतीक घुले यांना घेऊन कंपनीत गेले, जिथे त्यांनी वॉचमनला मारहाण केली आणि कुणालाही आत जाऊ दिले नाही. यावेळी सरपंच संतोष देशमुख हे कंपनीत आले आणि त्यांच्यात वादावाद झाला, असे सुदर्शन घुलेने कबूल केले आहे.
यावरून, हत्याप्रकरण आणि खंडणीच्या प्रकरणाचा परस्परसंबंध असल्याचे स्पष्ट झाले आहे.