या देशात राहतात जगातील सर्वात यशस्वी महिला; कमाई पण करतात पुरुषांपेक्षा दुप्पट

आता महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून चालताना दिसत आहे. प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करत आहे. अशात एक देश तर असा आहे, ज्या देशामध्ये जगातील सर्वात जास्त यशस्वी महिला राहतात.

या देशाचे नाव आहे न्युझिलंड. न्युझिलंडमध्ये प्रत्येक महिलेला पुरुषांइतका मानसन्मान दिला जातो. त्यामुळे तिथल्या महिला आर्थिकस्थितीत तर पुढे आहेतच सोबतच त्या सामाजिक कार्यातही पुढे आहे.

काही अर्थशास्त्रांनी महिलांच्या कार्यशैलीवर संशोधन केले आहे. त्या रिसर्चनुसार न्युझिलंड असा देश आहे, जिथे महिलांना पुरुषांच्या बरोबरीने दर्जा दिला जातो. तसेच त्यांचा मानसन्मान केला जातो. तिथे महिलांना पुरुषांना इतकी संधी नोकरीत मिळते.

न्युझिलंडने १०० सगळ्यात मोठ्या स्टॉक एक्सचेंजर कंपन्याचे डायरेक्टर्सचा रेकॉर्ड बनला आहे. विशेष म्हणजे या कंपन्यांच्या अर्ध्यापेक्षा जास्त कंपन्यांमध्ये महिलाच डायरेक्टर पदावर काम करत आहे.

महिला त्यांच्या मासिक पाळीमुळे आणि कुटुंबाच्या कामामुळे नोकरी करत असताना सुट्ट्या घेत असतात. त्यामुळे त्यांची कार्यक्षमता आपल्याला कमी वाटते. पण खरे पाहता महिलांची कार्यक्षमता पुरुषांच्या बरोबरीने आहे, असे लॉबी ग्रुपच्या हेडने म्हटले होते.

दरम्यान, साऊथ कोरीया आणि जपानसारख्या देशात खुप अडचणींना सामोरे जाऊन एखादी महिला उच्चपदावर पोहचते. महिलांच्या अशा स्थितीमुळेच अमेरीकेतल्या काही सामाजिक संघटनांनी ८ मार्च १९०९ ला महिलांचा गौरव आणि सन्मानासाठी करण्यासाठी ८ मार्च हा जागतिक महिला दिवस म्हणून घोषित केला होता.

महत्वाच्या बातम्या-

मी देशासाठी मरतोय, पण माझ्या पत्नीला उपचार मिळेनात; BSF जवान ढसाढसा रडला
धक्कादायक! नाशिकमध्ये ऑक्सिजन गळतीच्या घटनेत २२ जणांचा मृत्यू
पतीच्या निधनानंंतर कब्रस्थानमध्ये बनवलं महिलेने घर, पतीच्या आवडीचे गाणेही लावते

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.