यशस्वी होण्यासाठी रतन टाटा यांच्या ‘या’ गोष्टी आत्मसात करा, व्हाल करोडपती, जाणून घ्या..

सर्व जगभरात देवदूत म्हणून प्रसिद्ध असलेले भारतीय उद्योजक रतन टाटा यांचे नाव जगभरात आदराने घेतले जाते. त्यांनी आपल्या कष्टाच्या जीवावर मोठी भरारी घेतली आहे. तसेच ते देशाला मोठी मदत करतात. यामुळे त्यांना देवाची उपमा दिली जाते.

अनेक तरुण त्यांना प्रेरणास्थान मानतात. अनेकांना भरपूर पैसा कमवायचा आहे, यशस्वी व्हायचे आहे, परंतु ते मिळवण्यासाठी कोणत्या मार्गावरून जावे हे अनेकांना माहिती नसते. तुम्ही तुमचा उद्योग सुरू करत आहात किंवा अगोदरपासून करत आहात तर तुमच्यासाठी उद्योगपती रतन टाटा यांच्या गोष्टी उपयोगी ठरू शकतात.

एकाच गोष्टीवर लक्ष द्या, भारतातील अनेकजण उद्योगासोबत राजकारणात सुद्धा रस घेऊ लागतात. परंतु रतन टाटा या गोष्टींपासून दूर राहिले आहेत.
त्यांनी नेहमी आपल्या जीवनात कामालाच सर्वकाही समजले. सर्वप्रथम कामाला प्राधान्य दिले आहे.

रतन टाटा यांना खासगीत ओळखणारे सांगतात की, ते नेहमी शांत राहतात. ते आपल्या कंपनीच्या छोट्यातील छोट्या कर्मचार्‍यांना सुद्धा मोठ्या प्रेमाने भेटतात. संयम ठेवून काम करतात. तसेच टाटा ग्रुपची व्हॅल्यू खुप हाय आहे. अशावेळी रतन टाटा अपेक्षा करतात की, स्टार्टअपने सुद्धा व्हॅल्यू फॅक्टरला महत्व द्यावे.

रातोरात फरार सारख्या घटनांच्या ते सक्त विरोधात आहेत. त्यांनी अशा गोष्टी कधी केल्या नाहीत. एका इंटरव्ह्यूमध्ये रतन टाटा यांनी म्हटले होते की, स्टार्टअपसाठी ग्लोबल होण्यासाठी राईट टाइमसारखे काहीही नसते. ही जबाबदारी आणि समज फाऊंडरची असते की केव्हा त्यांना जागतिक विस्तार करायचा आहे. यावर लक्ष देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

सोबतच रतन टाटा यांनी म्हटले होते की, मी सुद्धा पाहतो की, प्रमोटर्स किती मॅच्युअर आहेत, आणि आपल्या नवीन कंपनीबाबत ते किती गंभीर आहेत. स्टार्टअपच्या प्रमोटर्सचा अ‍ॅटिट्यूट कसा आहे, ते कोणत्या आयडियासोबत आले आहेत, आणि त्याच्या सोल्यूशन्सबाबत त्यांच्या विचाराच्या आधारावर काम करतात हे महत्वाचे आहे.

ते नवीन कंपनीत गुंतवणुक करणे पसंत करतात. विशेषकरून नवीन आयडियाजच्या स्टार्टअपमध्ये. यामुळे अनेकांनी वरील गोष्टी समजून जर आपल्या उद्योगात काम केले तर तो नक्कीच यशस्वी होईल. जेणेकरून त्याला चार पैसे जास्त मिळतील.

ताज्या बातम्या

माझ्या बायकोचे माझ्या भावोजीसोबत अफेअर होते; शिल्पा शेट्टीच्या नवऱ्याचे खळबळजनक आरोप

पेट्रोल १०५ रुपयांवर! सामान्य नागरिकांना झटका, १२ दिवसात २ रुपयांनी महागले इंधन

कोण तुषार भोसले? त्याची अवकात काय मोठ होण्यासाठी सत्ताधाऱ्यांवर टीका करतात – प्रशांत जाधव

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.