सोलापूरमध्ये अँटीबॉडी कॉकटेल पद्धतीचा प्रयोग यशस्वी, कोरोना रुग्ण २४ तासांत होतोय बरा

सोलापूर । कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात थैमान घातले असून, या दोन लाटेमध्ये अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आतापर्यंत कोरोनावर निश्चित असे कोणतेच औषध नाही आहे. मात्र, अता अँटीबॉडी कॉकटेल पद्धतीचा प्रयोग सोलापुरात यशस्वी पार पडला आहे.

सोलापूर जिल्ह्यात बार्शीतील डॉ. संजय अंधारे यांनी मोनोक्लोनल अँटीबॉडीजचा प्रयोग करत कोविड रुग्णांना २४ तासात बरे केल्याचा दावा केला आहे. राज्यातला हा पहिलाच प्रयोग असल्याचे सांगितले जात आहे. डॉ. अंधारे यांनी त्यांच्या सुश्रुत हॉस्पिटलमध्ये कोरोनावरील आधुनिक उपचार पद्धतीतील मोनोक्लोनल अँटीबॉडीज किंवा अँटीबॉडी कॉकटेलचा वापर केला आहे.

अवघ्या २४ तासांत रुग्णांमध्ये सकारत्मक परिणाम दिसून आल्याचे त्यांनी सांगितले आहे. कोरोना संसर्गाच्या आतापर्यंतच्या उपचार पद्धतीमधील सर्वात प्रभावी उपचार पद्धतीने ५ रुग्णांवर उपचार करण्यात आले. त्यापैकी चार रुग्णांवर हे औषध अंत्यत प्रभावी ठरल्याचा दावा संजय अंधारे यांनी केला आहे. विशेष म्हणजे डायबिटीज, लठ्ठपणा, हायपर टेन्शन, अशा विविध आजारांसह गंभीर असलेल्या रुग्णांवर डॉ. अंधारे यांनी हा प्रयोग केला आहे.

या पद्धतीत कसलेही स्टिरॉइड वापर वापरले जात नसल्यामुळे म्युकरमायकोसिस किंवा पोस्ट कोविडचा मोठा धोका टाळत असल्याचा दावा देखील डॉक्टरानी केला आहे. अवघ्या २४ तासांत परिणाम करणाऱ्या या उपचार पद्धतीमुळे रुग्णांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचतोय. बार्शीसारख्या ग्रामीण भागात अशा प्रकारे पहिल्यांदाच हा प्रयोग करण्यात आला आहे.

तसेच राज्यातीलही हा पहिलाच प्रयोग असल्याचे सांगितले जात आहे. इंजेक्शनची किंमत ही ६० हजाराच्या आसपास जरी असली तरी त्रास कमी असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना मोठा दिलासा मिळात आहे. जर ही लस पूर्णपणे यशस्वी ठरत असेल तर याचा फायदा नक्की सगळ्यांना होईल.

ताज्या बातम्या

खुशखबर! खाद्यतेल दोन दिवसानंतर ५० रुपये लीटरपर्यंत स्वस्त होणार, वाचा सविस्तर..

सलमान खान, माधूरी दिक्षितसारख्या मोठ्या अभिनेत्यांसोबत काम करणाऱ्या साहिला चड्डाची आज झाली आहे वाईट अवस्था

राज्य सरकारने धाडस असेल तर अधिवेशन घेऊन दाखवावे नंतर मी केंद्राचं बघतो: उदयनराजे भोसले

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.