दोन वेळा शाळेत नापास झालेल्या मुलाने उभी केली २५ हजार कोटींची कंपनी, वाचा झोमाटोची यशोगाथा

फूड डिलिव्हरी ऍपच्या माध्यमातून लोकांच्या घरात अन्न पोचवणाऱ्या झोमाटो या कंपनीचे सक्रिय वापरकर्ते करोडोपर्यंत पोहोचले आहेत. झोमाटो गेल्या एका महिन्यापासून सतत चर्चेत आहे. कधीकधी फूड डिलिव्हरी बॉयच्या संदर्भात तर रेस्टॉरंटच्या मालकांकडून झोमाटो गोल्ड मेंबरशिप प्रकरणातील वादामुळे नेहमी चर्चेत असते.

पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की ही कंपनी सुरू करणारा दीपिंदर गोयल शाळेत कधीही हुशार नव्हता. तो दोनदा नापास झाला होता. पण जेव्हा जेव्हा तो त्याच्या मित्रांना दुपारच्या जेवणाच्या वेळी कॅफेटेरियात मेन्यू कार्ड पाहण्यासाठी लांबलचक लाईनमध्ये थांबलेला पाहायचा तेव्हा त्याला खुप वाईट वाटायचे.

कारण त्यात लोकांचा बराच वेळ वाया जायचा. म्हणूनच दीपिंदरने आपल्या मित्रांचा वेळ वाचवण्यासाठी मेनू कार्ड स्कॅन करून ते साइटवर अपलोड करण्याची कल्पना त्याच्या डोक्यात आली. या माध्यमातून त्याची वेबसाईट खुप हिट झाली.

त्यांच्या वेबसाईटवर हिट्सवर हिट्स येत होते. येथूनच दीपिंदरला फूड पोर्टलची कल्पना मिळाली. पंजाबमध्ये जन्मलेले दीपिंदर गोयल यांचे पालक दोघेही शिक्षक होते. दीपिंदर सहावीत नापास झाले. त्यानतंर ते अकरावीमध्येसुद्धा नापास झाले होते.

यानंतर त्यांनी अभ्यासाकडे गांभिर्याने लक्ष केंद्रित करण्यास सुरवात केली आणि प्रथमच आयआयटी परीक्षा पास केली. आयआयटी दिल्लीमधून पदवी घेतल्यानंतर दीपिंदर यांनी २००६ साली मॅनेजमेंट कन्सल्टिंग कंपनी बेन अँड कंपनीमध्ये नोकरी सुरू केली.

दरम्यान, स्टार्ट-अपची कल्पना त्यांच्या डोक्यात आली. त्यांनी फूड स्टार्ट-अप सुरू केले. २००७ मध्ये फुड डिलीव्हरी संबंधित कोणताही स्टार्ट-अप बाजारात काम करत नव्हता. दीपिंदर यांचा पहिला स्टार्ट अप अयशस्वी झाला.

यानंतर, आयआयटी मधील त्यांच्या एका मित्रासह पंकज चड्ढा याने रेस्टॉरंट्सचे मेनू उचलायला सुरुवात केली आणि स्कॅन करून नंबर अपलोड करणे सुरू केले. त्यांच्या फुडबे नावाच्या स्टार्टअपला थोडासा प्रवाह आला. त्यांच्या स्टार्टअपच्या नावावरून त्यांना ईबेकडून नोटीस आली होती.

यानंतर या दोघांनी फूडबीचे नाव बदलून जोमाटो केले. २००८ साली जोमाटोची सुरुवात अशी झाली. आपण सांगू की सध्या त्यांच्या कंपनीचे मूल्य सुमारे २५९२० कोटी रुपये आहे. त्यांना नोकरी सोडून व्यवसाय करणे सोपे नव्हते. चांगल्या पॅकेजसह आपली नोकरी सोडण्याचा आणि स्वतःसाठी काम करण्याचा निर्णय घेणे त्यांना सोपे नव्हते.

ते म्हणतात की पालकांना त्यांच्या व्यवसायासाठी तयार करण्यासाठी खूप वेळ लागला. त्यांचे पालक आधी त्यांच्या या स्टार्टअपशी खुश नव्हते. पण त्याची पत्नी नेहमी त्यांच्या पाठीशी उभी राहिली. कांचनला लाईमलाइटपासून दूर राहणे आवडते. जेव्हा स्टार्टअपमध्ये नवऱ्याला आपली गरज असते तेव्हा ती पूर्ण पाठिंबा देते.

त्या दिल्ली विद्यापीठात गणिताच्या प्राध्यापक आहेत. त्यांचे म्हणणे आहे की लोकांना एकत्र जोडून ठेवण्यासाठी पगाराची गरज असते. परंतु जर आपण आपले विजन आपल्या ग्रुपसोबत वाटले आणि त्यांना कंपनीचा एक महत्त्वाचा भाग मानले तर कोणीही त्यांना कधीही सोडणार नाही किंवा प्रतिस्पर्धीकडे जाऊ शकत नाहीत.

वेळेचा तुटवडा असल्याने शक्यतो दीपींदर सकाळी ८.३० वाजता त्यांच्या कार्यालयात भेट देतात आणि मिटींग घेतात. मीटींगमध्ये जो उशीरा येतो त्याला दंड भरावा लागतो आणि त्या दंडाच्या पैशातून सगळे लोक पार्टी करतात. हल्ली दीपिंदर सोशल मीडियावर बरेच चर्चेत आहेत.

त्यांच्या सेन्स ऑफ ह्युमरमुळे काही लोक विचारतात की ते स्वत: ट्विटर अकाउंट चालवतात की त्यासाठी कोणालातरी नोकरीला ठेवले आहे. आज दीपींदर २५ हजारपेक्षा जास्त कोटींचे मालक आहेत. झोमाटो हे भारतातील सगळ्यात जास्त वापरले जाणारे फुड डिलिव्हरी ऍप आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कळवा. जर ही माहिती आवडली असेल तर पुढे पाठवा.

महत्वाच्या बातम्या
डोंबिवलीतून फास्ट ट्रेन ते स्वतःची गाडी, वाचा भाऊ कदम-कुशल बद्रिकेच्या दोस्तीचा भन्नाट किस्सा!
वडीलांकडून ५ लाख रूपये घेऊन उभी केली होती ४ हजार कोटींची कंपनी, नंतर झाली अशी अवस्था
अबब! बिल गेट्स घटस्फोटानंतर मेलिंडा गेट्स यांना पोटगीपोटी देणार तब्बल १५ हजार कोटींची संपत्ती
कोरोनामुळे छोटा राजनचा मृत्यू झाल्याची बातमी खरी की खोटी? एम्सने दिली खरी माहिती

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.