प्रेरणादायी! आठवीला नापास झाला पण जिद्द सोडली नाही, उभी केली करोडो रूपयांची कंपनी

शाळेत शिकत असताना जर तुम्हाला चांगले गुण नसतील किंवा आपण अपयशी ठरलात तर काळजी करण्याची अजिबात गरज नाही. कारण काहीतरी करण्याची इच्छा तुम्हाला यश मिळविण्यापासून रोखू शकत नाही. अशीच एक गोष्ट त्रिशितित अरोरा याची आहे.

आज आम्ही तुम्हाला त्याची यशोगाथा सांगणार आहोत. कॉम्प्युटरविषयी त्यांच्या मनात प्रचंड रस असल्यामुळे तो दिवसभर कॉम्प्युटरवर असायचा त्यामुळे तो परिक्षेत नापास झाला होता. यावर कुटुंबीयांनी त्याच्यावर खुप झापले. पण त्याचा आग्रह काहीतरी वेगळं करण्याचा होता.

यामुळे केवळ वयाच्या २२ व्या वर्षी तो कोट्यावधी रूपयांच्या कंपनीचा मालक झाला आहे. त्रिशनित अरोड़ा टीएसी सिक्युरिटी नावाच्या कंपनीचा सीईओ आहे. ८ वी मध्ये नापास होण्यापासून ते स्वत:ची कंपनी अथक प्रयत्नांतून उभी करण्यापर्यंत ही कहाणी बरीच रंजक आहे.

त्रिशनित अरोरा यांनी सोशल मीडिया पेज ह्यूमन्स ऑफ बॉम्बेवर आपली कहाणी सांगितली आहे. त्याने सांगितले की तो दिवसभर संगणकावर व्हिडिओ गेम खेळत असे. त्रिशनित म्हणाला की त्याला नेहमीच संगणकांची आवड होती.

त्याला इतिहास आणि भूगोल समजत नव्हते परंतु संगणक खूप चांगल्या प्रकारे समजत असे. जेव्हा पहिला संगणक त्याच्या घरी आला, तेव्हा त्याने त्यावर रात्रंदिवस गेम खेळायला सुरुवात केली. असे केल्याने पालक खूश नव्हते म्हणून त्यांनी संगणकाला थेट पासवर्ड ठेवला.

पण त्रिशितनेही पासवर्ड क्रॅक केला. यानंतर, त्याच्या वडिलांनी त्याला फटकारले नाही, परंतु दुसरा संगणक दिला. आता तर तो दिवसातला पुर्ण वेळ संगणकावरच घालवत असे. पुढे त्यांनी सांगितले की दिवसभर संगणकावर वेळ घालवल्यानंतर मी अभ्यास करत नव्हतो.

परिक्षेला अभ्यास केला नसल्याने मी आठवीला फेल झालो होतो. जेव्हा पालकांना हे कळले तेव्हा त्यांनी त्रिशानितला मारहाण केली नाही किंवा त्यांना फटकारले नाही, परंतु त्याला काय करायचे आहे हे अतिशय आरामात विचारले.

त्यानंतर त्रिशानितने आपल्या आईवडिलांना मनात जे होते ते सांगून टाकले. तो म्हणाला की मला कॉम्प्युटरचा अभ्यास करायचा आहे. त्याने शाळा सोडण्याचे ठरविले ज्यामध्ये पालकांनी त्याचे पूर्ण समर्थन केले. तो केवळ १९ वर्षांचा असताना संगणकात तज्ज्ञ झाला.

त्यानेही काम सुरू केले आणि ६० हजार रुपयांचा पहिला पगाराचा चेक त्याला मिळाला. मोठ्या कंपन्यांचे मालक त्रिशनितला एथिकल हॅकर म्हणतात. पण तो हे काम करत नाही तर तो हॅकर्सपासून वाचवण्याचे काम करतो.

त्रिशानितने जी सर्व कामे केली आणि त्या कामातून जेवढा पण पैसा येत होता तो पैसा त्याने स्वताची कंपनी उभी करण्यासाठी लावला. त्याने टेक सिक्युरिटी नावाची कंपनी तयार केली. ज्याचे आज मोठे ग्राहक आहेत. त्रिशनित पंजाब प्रदेश आणि गुन्हे शाखेत आयटी सल्लागार आहे.

त्रिशनितने हॅकिंग वर हॅकिंग टॉक विथ त्रिशनीत अरोरा, द हॅकिंग एरा या विषयावरही त्याने अनेक पुस्तके लिहिली आहेत. त्याच्याकडे भारतात ४ आणि दुबईत १ कार्यालये आहेत. त्रिशानित याला त्याच्या या कामगिरीबद्दल बरीच बक्षिसेही मिळाली आहेत.

त्याने आतापर्यंत अनेक मोठ्या व्यक्तींसोबत भेट घेतली आहे आणि फोटोसुद्धा काढले आहेत. त्याची ही यशोगाथा अनेक हताश झालेल्या मुलांसाठी एक प्रेरणा देणारी गोष्ट आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कळवा. जर ही माहिती आवडली असेल तर पुढे पाठवायला विसरू नका.

महत्वाच्या बातम्या
मी माझं आयुष्य जगलेय, माझा बेड या तरुणाला द्या, आज्जीमुळे वाचला तरुणाचा जीव
रुग्णवाहिकेचे बिल तब्बल १ लाख २० हजार घेणाऱ्या डॉक्टरच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
कोरोना लस टोचताच अंकिता लोखंडेने सुरु केला स्वामींचा जप; पहा तिचा मजेदार व्हिडिओ
दिलीप कुमारच्या त्या डॉयलॉगचे कोरोना कनेक्शन; पहा दिलीप कुमारांचा व्हायरल व्हिडिओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.