थॉमस एडिसनच्या आईने ‘ते’ पत्र लपवून नसते ठेवले तर जगाला महान संशोधक भेटला नसता

जगाला बल्ब आणि विजेसारखी भेट देणाऱ्या प्रसिद्ध संशोधक थॉमस अल्वा एडिसन यांना कोण नाही ओळखत. त्यांनी फक्त बल्बचाच नाही तर अनेक हजारो वस्तूंचा शोध लावला आहे. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की एक असा काळ आला होता की त्यांना शाळेने शिकवण्यास नकार दिला होता.

पण ही गोष्ट त्यांना कळाली तेव्हा त्यांनी जेव्हा त्यांनी फोनोग्राम आणि बल्बचा शोध लावला होता. त्यांनी आपल्या आत्मचरित्रात आपल्या आईशी संबंधीत एक किस्सा सांगितला आहे. एडिसन यांचा जन्म ११ फेब्रुवारी १८४७ रोजी झाला होता.

त्यांच्या नावावर १,०९३ पेटंट आहेत. मग विचार करा त्यांनी त्यावेळी किती मेहनत घेतली असेल. आज पुर्ण जग त्यांनी बनवलेल्या अविष्कारांना वापरत आहे. त्यांना विजेचा बल्ब बनवण्यासाठी खुप कसरत करावी लागली होती.

बल्ब बनवण्यासाठी ते १० हजारपेक्षा जास्त वेळा फेल झाले होते. त्यावर ते म्हणाले की मी कधीच फेल झालो नाही उलट मी १० हजार असे रस्ते शोधून काढले जे माझ्या कामी आले नाही. एडिसन यांनी आपली पहिली प्रयोगशाळा फक्त १० वर्षांच्या वयात उभी केली होती.

त्यांच्या आईने त्यांना असे पुस्तक दिले होते ज्यामध्ये सगळ्या रासायनिक प्रयोगांबद्दल माहिती होती. त्यांना ते पुस्तक खुप आवडले आणि त्यांनी सगळे पैसै रसायन खरेदी करण्यासाठी घालवून टाकले. जर त्यांनी कोणता प्रयोग करण्यास सुरूवात केली तर तो प्रयोग पुर्ण होईपर्यंत ते झोपत नसायचे.

काहीवेळा तर त्यांना हा प्रयोग पुर्ण करण्यासाठी ४ ते ५ दिवस जायचे. काम करताना ते बऱ्याचवेळा जेवण करायचे विसरून जायचे. त्यांच्या लहानपणीचे असे बरेच किस्से आहेत ज्यातून आपण खुप काही शिकले पाहिजे.

त्यातील एक किस्सा खुप फेमस आहे. हा किस्सा तेव्हाचा आहे जेव्हा ते प्राथमिक शाळेत होते. एके दिवशी एडिसनला शिक्षकांनी एक कागद दिला आणि सांगितले की हा कागद तुझ्या आईला नेऊन दे. त्यांनी तो कागद आपल्या आईला नेऊन दिला.

त्यांची आई एका सुक्षिशित परिवारातून आलेली होती. जेव्हा त्यांनी तो कागद वाचला तेव्हा त्या ढसाढसा रडल्या. जेव्हा एडिसनने आपल्या आईला विचारले की रडायला काय झाले असे काय लिहीले आहे त्या कागदात.

तेव्हा त्यांची आई म्हणाली की, त्यामध्ये असे लिहीले आहे की तुमचा मुलगा खुप हुशार आहे आणि आमची शाळा त्याच्यासारख्या हुशार मुलाला शिकवण्यासाठी पात्र नाही. येथील शिक्षक एवढे शिक्षित नाहीत की एडिसनला शिकवू शकतील.

एडिसन यावरून खुप आनंदी झाले आणि त्यांनी घरीच अभ्यास करण्यास सुरूवात केली. त्यांची आई त्यांना शिक्षण देत असे. खुप वर्षे निघून गेली आणि एडिसन शिक्षण घेऊन एक चांगले वैज्ञानिक बनले होते.

त्यांच्या आईचे निधन झाले होते. तेव्हा आपल्या आईच्या काही जुन्या वस्तू पाहत असताना त्यांना शाळेतील तो कागद सापडला. तो कागद जेव्हा त्यांनी वाचला तेव्हा त्यांना रडू कोसळले. कारण त्यामध्ये लिहीले होते की, तुमचा मुलगा बुद्धीने खुप कमजोर आहे त्यामुळे पुन्हा त्याला आमच्या शाळेत पाठवू नका.

त्यांनी हा किस्सा आपल्या डायरीमध्ये लिहीला. एका महान आईने आपल्या बुद्धीने कमजोर असलेल्या मुलाला प्रसिद्ध वैज्ञानिक बनवले. एडिसन यांनी आपल्या १४ वर्षांच्या वयात एका ३ वर्षांच्या मुलाला रेल्वेच्या खाली येण्यापासून वाचवले होते. त्याच्या वडिलांनी एडिसनचे खुप आभार मानले होते.

त्याचबरोबर त्यांनी एडिसनला टेलिग्राम मशिन चालवायला शिकवली. त्यानंतर एडिसन यांना स्टेशनवर टेलिग्राम मशिन चालवण्याची नोकरी मिळाली होती. त्यांनी आपल्या नोकरीची वेळ रात्री करून घेतली होती जेणेकरून त्यांना वेगवेगळे प्रयोग करण्यासाठी जास्त वेळ मिळायला लागला.

तुमच्या माहितीसाठी एडिसनने बनवलेले ४० बल्ब पेटताना पाहण्यासाठी ३ हजार लोक जमा झाले होते. त्याच्यानंतर न्युयॉर्क शहरात पर्ल स्ट्रीट पॉवर स्टेशनची स्थापना झाली. ग्राहकांना वीज मिळायला लागली. त्यांना पहिला बल्ब बनवण्यासाठी ४० हजार डॉलर रूपये खर्च आला होता.

पण वर्ष १८७९ ते १९०० दरम्यान एडिसन यांनी सगळे शोध पुर्ण केले होते आणि ते एक संशोधक व एक श्रीमंत व्यापारी बनले होते. त्यांचे निधन १८ ऑक्टोबर १९३१ ला झाले होते. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कळवा. जर ही माहिती आवडली असेल तर पुढे पाठवायला विसरू नका.

महत्वाच्या बातम्या
गुड न्युज! पेट्रोल डिझेल टाकल्यावर मिळणार तब्बल १५० रुपयांची सूट; ‘असा’ मिळवा फायदा
सोनू सूदच्या मदतीवर कलेक्टरने व्यक्त केला संशय; सोनूने थेट पुरावेच फेकले तोंडावर
लसीचे दोन डोस घेऊनही पद्मश्री विजेत्या डाॅक्टरचे कोरोनामुळे निधन; रूग्णांवर मोफत करायचे उपचार
कुली चित्रपटातील हा चिमुकला आठवतो का? आता हा बिझनेस करून कमावतोय करोडो रूपये

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.