एकेकाळी रस्त्यावर पिशव्या विकायचा, आज आहे २५० कोटींचा मालक, वाचा प्रेरणादायी प्रवास

जीवनाचे दुसरे नाव म्हणजे संघर्ष. ज्याच्यात या संघर्षांना लढा देण्याचे आणि पुढे जाण्याचे धैर्य आहे, तो कोणतेही वादळ पार करू शकतो. कधीही हार न मानण्याची इच्छा आणि पुन्हा एकदा आकाशात उडण्याची इच्छा एखाद्या व्यक्तीला यशाचा मार्ग दाखवते.

तरुण जैन त्याच्यातीलच एक नाव आहे. बर्‍याच अडचणींना तोंड देत त्यांनी धैर्य टिकवून ठेवले आणि आज ते एका मोठ्या कंपनीचे मालक आहेत. हजारो लोकांना रोजगार देणारी ही कंपनी आहे. 1992 मध्ये हर्षद मेहता घोटाळा प्रकरणात शेकडो लोकांनी पैसै गमावले होते. मूलचंद जैन हेदेखील त्यांच्यात होते.

या घोटाळ्यातील झारखंडमधील व्यापारी मूलचंद जैन यांचे सर्व पैसे बुडाले होते.रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, परिस्थिती बिकट झाल्यावर जैन यांनी आपला मुलगा तुषार जैन याच्या मदतीने मुंबईच्या रस्त्यावर पिशव्या विकायला सुरुवात केली.

लवकरच तुषार यांनी संघर्ष व परिश्रम करून आपली स्थिती सुधारली आणि हाय स्पिरिट कमर्शियल वेंचर्स नावाने व्यवसाय सुरू करण्यात तो यशस्वी झाला. ते या कंपनीचे सहसंस्थापक आहेत. आज ते भारतातील चौथे सगळ्यात मोठे बॅकपॅक आणि सामान विक्रेते आहेत.

आज त्यांची भारतात 10 क्षेत्रीय कार्यालये आहेत आणि मुंबईत त्यांचे मुख्यालय आहे.सन 2012 मध्ये सुरू झालेला हा उपक्रम आज 250 कोटी रुपयांची कंपनी बनला आहे. 41 वर्षांच्या तुषार यांनी इतकी उंची तर गाठली पण त्याच्यामागे खुप मोठा संघर्ष आहे.

त्यांच्या संघर्षाची कहाणी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ते आज अनेक लोकांसाठी प्रेरणा ठरले आहेत. १९९९ मध्ये, तरुण यांनी ३०० किरकोळ विक्रेत्यांसह व्यवसाय सुरू केला आणि २००२ मध्ये मुंबईतून आपले काम संपूर्ण भारतभर पसरवले.

त्यांनी प्रथम priority नावाचा इनहाउस ब्रँड बाजारात आणला. वर्ष 2006 पर्यंत, त्यांनी अनेक ग्राहकांसह कस्टमाईज्ड बॅगची विक्री केली. 2007 सालापर्यंत त्यांनी बाजारात त्यांचे नाव मोठे झाले होते. यासाठी त्यांनी त्यांचे उत्पादन युनिट उघडले आणि दररोज 3 ते 4 हजार बॅग बनविण्यास सुरवात केली.

त्यावर्षी त्यांना सुमारे 25 कोटींचा नफा झाला होता. सन 2014 पर्यंत त्यांची कंपनी दररोज 10 ते 20 हजार बॅग बनविण्यास सुरुवात केली आणि दररोजची उलाढाल 90 कोटींवर पोचली. सततच्या यशानंतर, त्यांनी 2017 मध्ये त्यांनी traworld आणि hashtag लाँच केले.

या मदतीने त्यांचा व्यवसाय 250 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला. ते सांगतात की कमी पैशांमध्ये चांगली क्वालिटी देणे हेच त्यांचे यश आहे. ट्रावल्डची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणजे बॉलिवूडची नायिका सोनम कपूर आहे.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे तरुण यांनी सध्या 500 लोकांना रोजगार दिला आहे आणि 500 आर्टिस्ट त्यांच्या येथे प्रोजेक्टवर काम करत असतात. एवढेच नव्हे तर त्यांनी अनेक उद्योजकांना प्रशिक्षण दिले आहे, जे आज 50 कोटींपर्यंतची कमाई करण्यात यशस्वी आहेत.

युआर स्टोरीला दिलेल्या मुलाखतीत तरुण म्हणाले की, आम्ही पुढील चार ते पाच वर्षांत एक हजार कोटी रुपयांची उलाढाल असलेली कंपनी बनण्याचे स्वप्न पाहत आहोत. आम्ही बॅकपॅक तयार करण्यासाठी मुंबईजवळील भिवंडी येथे 1.31 लाख चौरस फूट कारखाना सुरू केला आहे.

आम्ही येत्या सहा महिन्यांत त्याच प्रोडक्ट्सवर काम करून आणखी चांगल्या प्रतीचे सामान आणि त्यासाठी दरमहा 60,000 बॅगची क्षमता असलेले प्रकल्प उभारणार आहोत. त्याच ठिकाणी आम्ही बिहारमध्ये पाटणा येथे एक मोठा प्रकल्प स्थापित करीत आहोत.

तो प्रकल्प तयार झाल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही दरवर्षी 25 लाख बॅग्ज तयार करणार आहोत. तरूण हे अनेक लोकांसाठी प्रेरणा आहेत. तुम्हाला हा लेख कसा वाटला आम्हाला कळवा. जर हा लेख आवडला असेल तर पुढे पाठवायला विसरू नका.

महत्वाच्या बातम्या
इंडियन आयडल: पवनदीप राजनच्या अफलातून डान्सवर फिदा झालेल्या जज अनु मलिक यांनी काय केलय बघा..
प्रसिद्ध अभिनेत्री प्रार्थना बेहरेचा नवरा आहे साउथ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता; पहा फोटो..
शिवशक्ती भीमशक्तीची जोडी जमली; मराठा आरक्षणासाठी संभाजीराजेंना प्रकाश आंबेडकरांची साथ
‘मेरे सैंया सुपरस्टार’ गाण्यावर डान्स केलेल्या त्या नवरीला टक्कर द्यायला आली आजून एक मुलगी; पहा दोघींचा डान्स

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.