शिव नादर: खाजगी नोकरी सोडून मित्रांच्या मदतीने सुरू केली कंपनी, आज आहेत १.७० लाख कोटींचे मालक

जर तुमच्या आयुष्यात ध्येय असेल तर ते पुर्ण करण्याचे स्वप्न पाहा. जर तुम्हाला स्वप्ने पडत नसतील तर तुम्हाला आयुष्यात कोणतेही ध्येय राहणार नाही आणि ध्येयांशिवाय यश मिळवता येणार नाही. हे शब्द देशाचे सुप्रसिद्ध व्यापारी आणि एचसीएल टेकचे संस्थापक शिव नादर यांचे आहेत.

त्यांनी मोठी घोषणा करत कंपनीचे अध्यक्षपद सोडले होते. आता त्यांची मुलगी रोशनी नादर मल्होत्रा अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारत आहे. आता शिव नादर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कायम राहणार आहेत. त्यांचे पद मुख्य धोरण अधिकारी असेल.

नादर म्हणाले, आपण अशा काळात जगत आहोत जिथे जगभरातील संस्था आणि लोकांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. यामुळे व्यवसायाला चालना मिळाली आहे. कारण बिकट काळामुळे व्यवसायातील नवीन बदलांना प्रोत्साहन मिळते.

एचसीएल, त्याच्या भागीदारांसह, ग्राहकांना नवीन वातावरणाशी जुळवून घेण्यास मदत करत आहे कारण हेच आता न्यु नॉर्मल असणार आहे. तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज आणि देशातील मोठे उद्योगपती शिव नादर यांचा जन्म १४ जुलै १९४५ रोजी झाला होता.

आज दक्षिण भारतातील छोट्या खेड्यातून शिव नादर यांच्यामुळे भारताने माहिती तंत्रज्ञान व संगणक विज्ञान क्षेत्रात आपले स्थान निर्माण केले आहे. ते तामिळनाडूचे रहिवासी असून ते मुळचे हिंदू आहेत. ते एचसीएल तंत्रज्ञानाचे फाऊंडर (संस्थापक) आणि चेअरमन (अध्यक्ष) आहेत.

एचसीएल माहिती तंत्रज्ञान सेवेसाठी प्रसिद्ध असलेली कंपनी आहे. त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात पुण्यात झाली जिथे ते वालचंद ग्रुप ऑफ इंजिनिअरिंगचा भाग झाले. व्यवसाय चालवण्याचा काही अनुभव मिळाल्यानंतर त्यांनी ते काम सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला.

आपल्या मित्रांच्या आणि इतर व्यावसायिक भागीदारांच्या मदतीने तो या देशातील सर्वात मोठी तांत्रिक क्रांती घडवून आणण्यात गुंतले. त्यांनी खाजगी नोकरी सोडली आणि पाच मित्रांसह ‘मायक्रोकॉम्प लिमिटेड’ नावाची कंपनी सुरू केली. त्यांची कंपनी १९७६ मध्ये टेलिडीजीटल कॅल्क्युलेटरची विक्री करीत असे.

शिव नादर यांनी एका मुलाखतीत सांगितले की, मी पहिल्यांदा ज्या व्यक्तीला भेटलो होतो त्याचे नाव अर्जुन होते. तो माझ्यासारखा मॅनेजमेंट ट्रेनीही होता. आम्ही चांगले मित्र झालो आणि आजपर्यंत आहोत. यानंतर आम्ही दोघांनी डीसीएममध्ये काम करणारे आमच्या प्रकारचे लोक एकत्र केले आणि मिळून मिसळून काम करण्यास सुरवात केली.

लवकरच या कंपनीला हिंदुस्तान कॉम्प्यूटर्स लिमिटेड (एचसीएल) असे नाव देण्यात आले आणि त्यांनी संगणक बनविणे सुरू केले. काही दिवसांतच भारताची ही कंपनी जगभरातील एक नामांकित ब्रँड बनली. १९८० मध्ये त्यांनी सिंगापूरमध्ये आयटी हार्डवेअरची विक्री करण्यासाठी ‘फोर ईस्ट कॉम्प्यूटर्स’ ची स्थापना करून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेची ओळख निर्माण केली.

पहिल्याच वर्षी त्यांनी सुमारे दहा लाख रुपये मिळवले होते. यानंतर नादर यांनी मागे वळून पाहिले नाही. १९८२ मध्ये कंपनीने आपला पहिला पीसी बाजारात दाखल केला. मग आयटी व्यवसायाशी संबंधित पाच कंपन्या त्यांच्या फर्ममध्ये विलीन झाल्या आहेत.

आज ते हजारो कोटींचे मालक आहेत आणि त्यांची मुलगी आता त्यांचा सगळा पदभार सांभाळत आहे. आज त्यांच्यामुळे हजारो लोकांना रोजगार मिळाला आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कळवा. जर ही माहिती आवडली असेल तर पुढे पाठवायला विसरू नका.

महत्वाच्या बातम्या
फुलाला सुगंध मातीचा मालिकेतील कीर्तीचा जीन्सवरील डान्स तुफान व्हायरल; पहा व्हिडीओ
दोन वेळा शाळेत नापास झालेल्या मुलाने उभी केली २५ हजार कोटींची कंपनी, वाचा झोमाटोची यशोगाथा
वडीलांकडून ५ लाख रूपये घेऊन उभी केली होती ४ हजार कोटींची कंपनी, नंतर झाली अशी अवस्था
इंजेक्शनमध्ये पाणी भरुन दिड लाखांना विकून त्या पैशातून घ्यायचा गर्लफ्रेंडला महागडे गिफ्ट

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.