आजोबा लॉर्ड माउंटबॅटनचे आणि वडील जवाहरलाल नेहरूंचे केस कापायचे, वाचा जावेद हबीबची यशोगाथा

आज आम्ही तुम्हाला जगातील सर्वात प्रसिद्ध न्हावी जावेद हबीबची यशोगाथा सांगणार आहोत. तुम्हाला कदाचित माहित नसेल पण जावेद हबीबचे आजोबा नजीर अहमद हे लॉर्ड माऊंटबेटनचे पर्सनल हेअर ड्रेसर होते.

त्यानंतर जेव्हा आपला देश स्वतंत्र झाला तेव्हा ते प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरूंचे पर्सनल हेअर ड्रेसर बनले होते. त्यानंतर नजीर यांचा मुलगा म्हणजे जावेदचे वडिल हबीब अहमद हे जवाहरला नेहरूंचे, ऑबरॉयजचे, राजमाता गायत्री देवी आणि देशाचे राष्ट्रपती यांचे पर्सनल हेअर ड्रेसर बनले.

त्यांचे सगळे कुटुंब राष्ट्रपती भवनमध्येच राहत होते. जावेदचा जन्मसुद्धा राष्ट्रपती भवनात ब्लॉक १२ मधील हाऊस नंबर ३२ मध्ये झाला होता. जावेदला त्यांच्या वडिलांनी हेअरड्रेसिंगचे बारकावे शिकवले. पण जावेदला या व्यवसायात रस नव्हता.

त्यांना आपल्या आजोबांची आणि वडिलांची पंरपरा पुढे चालवायची नव्हती. त्यामुळे जावेदने फ्रेंच भाषा शिकून घेतली होती. त्यांना दुसऱ्या क्षेत्रात करिअर करायचे होते. ग्रॅजुएशन झाल्यानंतर त्यांना हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स करायचा होता.

पण वडिलांच्या म्हणण्यानुसार जावेद यांनी लंडन येथे हेयर डिझायनिंगचा कोर्स केला. त्यानंतर जावेद यांनी सनसिल्कमध्ये काही दिवस नोकरी केली. लंडनमध्ये त्यांना मॅक्डोनल्डच्या दुकानावरून एक आयडिया सुचली.

जावेद यांनी पाहिले की कशा प्रकारे मॅक्डोनल्ड पुर्ण जगात आपले बर्गर विकत आहे. हेअरड्रेसिंग तर माणसाची गरज आहे. असे करून आपण आपला बिझनेस वाढवू शकतो. लंडनवरून परतल्यानंतर जावेद यांनी आपल्या वडिलांच्या सलुनच्या दुकानात काम केले.

पण त्यांना तिथे जास्त काही करण्यास भेटले नाही. त्यांना तिथे जास्त गोष्टी शिकण्यास भेटत नव्हत्या. त्यानंतर त्यांनी हेअर कटिंग आणि ग्रुमिंग लोकांना ट्रेनिंग द्यायला सुरूवात केली. जावेदने आपले पहिले आउटलेट केरळमध्ये खोलले.

त्यांच्या वडिलांना त्यांची ही आयडिया आवडली नाही. त्यांच्या वडिलांच्या म्हणणे होते की छोट्या शहरात मोठे सलून किंवा आउटलेट चालवणे अवघड आहे. पण जावेद यांनी वडिलांना खोटे ठरवले. त्यावेळी जावेद यांनी केरळमध्ये १५-१५ तास काम केले.

जावेद यांनी जेव्हा पहिले स्टोर खोलले तेव्हा पाच वर्षांच्या आतच त्यांनी ५० स्टोर खोलले. सध्या जावेद यांचे ११० शहरांमध्ये ८४६ आउटलेट आहेत. जावेद म्हणले की, जर त्यांचे एखादे आऊटलेट चालले नाही तर ते स्वता तेथे जाऊन काम करतात आणि त्या स्टोरला नुकसानातून बाहेर काढण्यासाठी मदत करतात.

महत्वाच्या बातम्या
मुलीच्या डोक्यातील कोंडा घालवण्यासाठी केला घरगुती उपाय, आता त्याच्यातूनच कमावतेय करोडो
कपिल शर्मा फेम सुगंधा मिश्रा आणि संकेत भोसलेवर पोलिसांनी केला गुन्हा दाखल; वाचा संपुर्ण प्रकरण
शिक्षकाने तयार केला शालू नावाचा रोबोट; ४७ भाषा बोलण्यात तरबेज, लोकांशीही साधणार संवाद
मुंबई इंडियन्सने जिंकले सगळ्यांचे मन, विदेशी खेळाडूंना घरी पाठवण्यासाठी केली ‘ही’ सोय

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.