पोरबंदरमधील गरीब मुलगा कसा झाला जेठालाल? वाचा दिलीप जोशींचा थक्क करणारा प्रवास

आज आम्ही तुम्हाला तारक मेहता का उल्टा चष्मा मधील जेठालाल म्हणजे त्यांची भूमिका साकारणारे दिलीप जोशी यांच्याबद्दल काही माहिती सांगणार आहोत. आज दिलीप जोशींचा वाढदिवस आहे. आपण सर्व त्यांना आज जेठालाल म्हणूनच ओळखतो.

छोट्या पडद्यावरील तारक मेहता का उल्टा चष्मा या कार्यक्रमाला आता एक दशकाहून जास्त काळ उलटून गेला आहे. आजही तो कार्यक्रम तितकाच लोकप्रिय आहे. आजपर्यंत या मालिकेने प्रेक्षकांचे तुफान मनोरंजन केले आहे.

त्यातीलच एक महत्वाचे पात्र म्हणजे जेठालाल गडा. जेठालालचे असंख्य चाहते आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का की जेठालाल हे पात्र साकारणारे दिलीप जोशी यांच्या जीवनात एक असा काळ होता की त्यांना कामासाठी भटकावं लागत होतं.

गुजरातच्या पोरबंदर या ठिकाणी एका गुजराती कुटुंबात दिलीप जोशी यांचा जन्म झाला होता. २६ मे १९६८ ला त्यांचा जन्म झाला होता. अवघ्या वयाच्या १२ व्या वर्षापासून त्यांना अभिनयाची आवड होती. त्यांनी नाटकांमध्ये काम करायला सुरूवात केली होती.

तेथूनच त्यांच्या करिअरला सुरूवात झाली होती. १९८९ साली त्यांना मैने प्यार किया या चित्रपटात रामूची भुमिका साकारण्याची संधी मिळाली. यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये आणि मालिकांमध्ये काम केले आणि नाव कमावले.

पण त्यांना खरी ओळख मिळाली ती तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेमध्ये. जेठालाल या पात्राने त्यांना वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. त्यांच्या एका वेगळ्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात वेगळी छाप पाडली आहे.

एका मुलाखतीत दिलीप जोशी यांनी सांगितले आहे की, तारक मेहता ही मालिका भेटायच्या आधी एक वर्ष त्यांच्याकडे कोणतेच काम नव्हते. ते कामासाठी भटकत होते. २००८ साली त्यांना या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली होती.

त्यानंतर या मालिकेने कधीच पुर्णविराम घेतला नाही. मालिका आणि मालिकेतील इतर पात्रांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. त्यातील जेठालाल हे पात्र सगळ्यात जास्त चर्चेत असलेले पात्र आहे. त्यांचे डायलॉग खुप फेमस आहे. आणि त्यातील काही डायलॉग तर स्वता दिलीप जोशी यांनी लिहीले आहेत.

अभिनयाव्यतिरिक्त दिलीप जोशी हे एक सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत. पण त्यांना अभिनयात जास्त रस होता. सॉफ्टवेअर इंजिनिअरींगची पदवी घेऊन त्यांनी नोकरी केली नाही. त्यांना दोन वेळा इंडियन नॅशनल थिएटर उत्कृष्ट अभिनयासाठी पुरस्कारही मिळाला आहे.

या मालिकेमुळे दिलीप जोशी यांचे संपुर्ण जीवनच बदलून गेले. महिन्यातील २५ दिवस ते काम करतात. महिन्याला त्यांना लाखोंचे मानधन मिळते. ते आपल्या कुटुंबासमवेत मुंबईमध्येच राहतात. त्यांना गाड्यांचा खुप छंद आहे.

त्यांच्याकडे अनेक गाड्या आहेत जसे की ऑडीसहीत त्यांच्याकडे अनेक महागड्या गाड्या आहेत. सुरूवातील फक्त ५० रूपयांमध्ये काम करणारे दिलीप जोशी आज कोट्यावधींचे मालक आहेत. त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कळवा. जर ही माहिती आवडली असेल तर पुढे पाठवायला विसरू नका.

महत्वाच्या बातम्या
नवरदेव जसा कबुल है बोलला, तशी नवरी लागली नाचायला अन् अख्ख्या कुटुंबासमोर केलं नवऱ्याला किस
“आजोबांनी आयपीएल आणून चीअरलीडर्स नाचवल्या, नातू कोविड सेंटरमध्ये नाचतो”
पैशांसाठी जुही चावलाने केले होते जय मेहतासोबत लग्न?

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.