आईसोबत मेडीकलमध्ये काम करणार मुलगा कसा झाला ऍपलचा सीईओ, वाचा टीम कुक यांची यशोगाथा

आज आम्ही तुम्हाला ऍपल कंपनीबाबत काही महत्वाची माहिती सांगणार आहोत. अनेकांना ऍपलचा आयफोन घ्यायची इच्छा असते पण त्यांना या कंपनीबद्दल काही माहिती असणे आवश्यक आहे. आज ऍपल कंपनीचे सीईओ टीम कुक यांचीही थोडीफार माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

जगातील सगळ्यात प्रसिद्ध मोबाईल कंपनी ऍपलचे सीईओ टीम कुक हे जेव्हा तरूण होते तेव्हा पेपर टाकायचे. याशिवाय त्यांनी आईबरोबर फार्मसीमध्ये काम केले, पण त्यांची स्वप्ने खुप मोठी होती. या विचाराने त्यांनी खुप कष्ट घेतले आणि आज ते जगातील सर्वोत्कृष्ट टेक कंपनी ऍपल कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.

तुमच्या माहितीसाठी आयफोन कंपनी ऍपल कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी टिम कुक यांना २०१८ मध्ये ८४ कोटी (१.२ करोड डॉलर) बोनस प्राप्त झाला. हे आतापर्यंतचे सगळ्यात जास्त बोनस आहे. ऍपलने फाइलिंगमध्ये बोनसच्या रकमेबद्दल माहिती दिली.

कुक यांना २०१७ मध्ये ६५ कोटींचा बोनस मिळाला. २९ सप्टेंबर २०१९ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात कूक यांना २१ कोटी रुपये (३० लाख डॉलर) पगाराच्या रुपात मिळाले. तसेच, ८४७ कोटी रुपयांचे शेअर्स (१२.१ करोड डॉलर) मिळाले आहेत.

इतर भत्ते म्हणून ४.७७ कोटी रुपये (६.८२ लाख डॉलर) प्राप्त झाले. अशा प्रकारे, त्याची एकूण कमाई ९५६.७७ कोटी रुपये होती. टीम कूक हे ऑर्न विद्यापीठात शिकत असताना रेनॉल्ड्स ऍल्युमिनियम कंपनीत अर्धावेळ काम करायचे.

हे काम देखील त्यांच्या अभ्यासाचा एक भाग होता. कंपनीचे कर्मचारी हळू हळू कंपनी सोडून निघून गेले. या घटनेनंतर टीम यांनीं कंपनीच्या अध्यक्षांना मदत केली आणि त्याच्याबरोबर कंपनीला पुढे नेले. त्यांना अभियंता व्हायचे होते. यामुळे त्यांनी औद्योगिक अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले.

त्यांच्या एक शिक्षिका त्यांना a solid B-plus किंवा A-minus student म्हणायच्या. कूक यांच्या कमाईचा मोठा वाटा ऍपलच्या शेअर्समधून आला आहे. त्यांना इंन्क्रिमेंट म्हणून दरवर्षी शेअर्स मिळतात. यांची संख्या एसएंडपी-५०० च्या कंपन्यांच्या आधारे ऍपलची कंपनी किती प्रगती करते याच्यावर ठरवली जाते.

२०१८ च्या ऑगस्टमध्ये कूक यांना ५.६० लाख शेअर्स मिळाले होते. कारण, ऍपलच्या शेअरने एसएंडपी-५०० कंपन्यांपैकी दोन तृतीयांश कंपन्यांपेक्षा चांगली कामगिरी केली. २०१८ च्या आर्थिक वर्षात ऍपलच्या शेअरने गुंतवणूकदारांना ४९ टक्के परतावा दिला आहे.

ऍपलच्या अन्य ४ अधिकाऱ्यांना २८ कोटी रुपयांचा बोनस (४० लाख डॉलर्स) मिळाला. त्या प्रत्येकाला पगार आणि समभागांसह एकूण १८५.५ कोटी रुपये (२.६५ करोड डॉलर्स) मिळाले. ऍपलने २०१९ च्या डिसेंबरच्या तिमाहीसाठी महसुली अंदाज कमी केला होता.

ऍपलने जाहीर केले होते की ते ऑक्टोबर-डिसेंबर २०१८ तिमाहीतील महसुली उत्पन्नाच्या अंदाजात ५.५ टक्के कमी करत आहेत. जवळजवळ २० वर्षांत पहिल्यांदाच हे घडले होते. आयफोनची विक्री अपेक्षेपेशा कमी झाल्याने कंपनीने रेव्हेन्यू गायडंसमध्ये कटौती केली होती.

ऍपलने २९ जानेवारी २०१९ रोजी तिमाही निकाल जाहीर केला होता. गायडंसच्या अभावामुळे ऍपलचा स्टॉक १० टक्क्यांनी खाली आला होता. या घसरणीमुळे कंपनीची बाजारपेठ एकाच दिवसात ५ लाख कोटी रुपयांनी कमी झाली होती. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कळवा. जर ही माहिती आवडली असेल तर पुढे पाठवायला विसरू नका.

महत्वाच्या बातम्या
कॅन्सरमुळे खुपच खराब झाल्या आहेत किरण खेर; पहिल्यांदाच समोर आले उपचार सुरु असतानाचे फोटो
सर्व पुरुष असेच असतात का? घरातील ‘ते’ खाजगी फोटो शेअर करत शाहीद कपूरच्या पत्नीचा प्रश्न; पहा फोटो..
महाराष्ट्र कोरोनाशी चांगला लढतोय; पंतप्रधान मोदींनी थेट उद्धव ठाकरेंना फोन करून केले कौतूक
VIDEO: हिंदूस्थानी भाऊला पोलिसांनी केली अटक; जाणून घ्या नेमके काय आहे प्रकरण…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.