कोरोनाकाळातील ठाकरे सरकारचे काम हे कौतूकास्पद;भाजप खासदाराची ठाकरे सरकारला शाबासकी

राज्यभरात कोरोनाचे हजारो रुग्ण भेटत आहे. वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात आरोग्य यंत्रणेचा अभाव निर्माण झाला आहे. ऑक्सिजन आणि औषधांचा तुटवडा राज्यभरातील रुग्णालयात जाणवत आहे.

कोरोनाच्या पार्श्भुमीवर राज्य सरकार आणि विरोधी पक्षातील आरोप प्रत्यारोपणाचा खेळ सुरु आहे. भाजप नेत्यांकडून सतत टिका होत आहे, असे असतानाच आता भाजप खासदाराकडून ठाकरे सरकारचे कौतूक करण्यात आले आहे.

आता भाजप राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कोरोना काळातील कामाचे कौतूक केले आहे. त्याबाबत सुब्रमण्यम स्वामी यांनी खास ट्विट केले आहे.

मुंबई कोरोना व्हायरस संक्रमणाचा दर कमी केल्याबद्दल उद्धव ठाकरे सरकारला शाबासकी मिळायला हवी. तसेच मला आता विश्वास आहे, की आता रुग्णालयेही सज्ज झाली आहे, असे सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले आहे.

कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात १५ दिवसांचा लॉकडाऊन केलेला आहे. वाढत्या रुग्णांच्या संख्येला रोखण्यासाठी लॉकडाऊन हा एकमेव पर्याय आहे, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले होते. या लॉकडाऊनचा चांगलाच फायदा झालेला दिसून येत आहे.

दरम्यान, राज्यात दिवसाला हजारो रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह भेटत आहे. शनिवारी राज्यात ६३ हजार २८२ कोरोनाबाधित कोरोना रुग्ण सापडले होते. तर दिवसभरात ८०२ कोरोना रुग्णांचा मृत्यु झाला आहे. तसेच शनिवारी ६१ हजार ३२६ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे.

महत्वाच्या बातम्या-

नंदीग्राममधील काट्याच्या टक्करमध्ये अखेर ममतांनी भाजपच्या शुभेंदू अधिकारींना धुळ चारली
स्पर्धेपुर्वी बाप गेला, भर स्पर्धेत फाॅर्मही हरपला; पण अखेर वादळ आलेच; मैदानातूनच बापाला केले नमन
कोरोनामुळे मृत्यु झाला तर नातेवाईकांना या सरकारी योजनेतून मिळतील २ लाख; असा करा अर्ज

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.