दिल्लीचे नाव जोपर्यंत इंद्रप्रस्थ ठेवले जात नाही तोपर्यंत देश संकटात असेल: सुब्रमण्यम स्वामी

नवी दिल्ली | देशाची राजधानी दिल्लीचे नाव बदलून प्राचिन नाव इंद्रप्रस्थ ठेवण्यात यावे अशी मागणी जेष्ठ भाजप नेते डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी केली आहे. याबाबत स्वामी यांनी ट्विट केले आहे.

कोरोनाचा महामारीच्या दुसऱ्या लाटेत संपुर्ण देशात भयंकर स्थिती निर्माण झाली आहे. देशाची राजधानी दिल्लीतही कोरोनाचा संसर्ग गंभीर रुप धारण करत आहे. अशात भाजप नेते आणि राज्यसभा खासदार डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांनी एक ट्विट केले. त्यांनी ट्विटमध्ये केलेल्या मागणीनंतर देशात पुन्हा एकदा नामांतराचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

ट्विटमध्ये डॉ. स्वामी यांनी म्हटले आहे की, हिंदूंच्या पुनर्जागरणासाठी दिल्लीचे नाव इंद्रप्रस्थ केले पाहिजे. यासाठी द्रोपदी ट्रस्टच्या डॉ. नीरा मिश्र यांनी केलेला अभ्यास पर्याप्त आहे. डॉ. नीरा मिश्र यांनी आपल्या सखोल अभ्यासात याबाबतचे पुरावे एकत्र केले आहेत.

पुराव्यांमध्ये दिल्लीचं नाव इंद्रप्रस्थ असल्याचे दिसून येत आहे. महाभारतातही इंद्रप्रस्थ नावाचा उल्लेख आहे. तसेच इंद्रप्रस्थबाबतचे पुरावे ब्रिटीश सरकारच्या १९११ च्या अधिसूचनेतही मिळत आहेत.

भारतीय पुरातत्व सर्व्हेक्षण नोंदवहीत ब्रिटीश आणि मुखलांनी इंद्रप्रस्थ नावाचा उल्लेख केल्याचे नमूद आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबंधित मंत्र्यांना याबाबत सूचना दिल्या पाहिजेत. असे स्वामी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

तसेच, जोपर्यंत दिल्लीचे नाव इंद्रप्रस्थ करणार नाही तोपर्यंत देशातील समस्या सुटणार नसल्याचे आणि तोपर्यंत देशात वादाची स्थिती कायम राहील असे तामिळनाडूतील एका महान ऋषींनी मला सांगितले आहे. असे डॉ. स्वामी यांनी म्हटले आहे.

दरम्यान, भाजप नेते सुब्रम्हण्यम स्वामी यांच्या ट्विटनंतर राजकीय आरोप-प्रत्यारोप पुन्हा सुरू होणार असल्याचे दिसत आहे. विरोधकांना नामांतराच्या मुद्याचं आयतं कोलीत हाती मिळालं आहे. त्यामुळे येत्या काळात दिल्लीच्या नामांतरावरून राजकारण तापण्याची चिन्हं आहेत.

महत्वाच्या बातम्या-
ऑक्सिजन सिलेंडर न मिळाल्याने शेतात झाडाखाली जाऊन बसला; अन् ३ दिवसातच कोरोनाला हारवून आला
लाखो कोरोना रुग्णांचा ऍलोपॅथीमुळे मृत्यु झाला आहे; बाबा रामदेव यांचे खळबळजनक वक्तव्य
वडिलांनी जमीन विकून व्यवसाय करण्यासाठी दिले २० हजार, मुलाने उभी केली २४०० कोटींची कंपनी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.