बातमी कामाची! घरबसल्या जमा करा जीवन प्रमाणपत्र; पेन्शनधारकांसाठी मोठा दिलासा

मुंबई | पेन्शनधारकांसाठी महत्वाची बातमी आहे. जिवंत असल्याचा दाखला (Life Certificate) जमा करण्यासाठी आता रांगेत उभं राहण्याची गरज नाही. एसबीआय कडून देखील लाइफ सर्टिफिकेट जमा करण्याची सुविधा ऑनलाइन पद्धतीने देण्यात आली आहे.

पेन्शनधारकांना नोव्हेंबरमध्ये तुमचे जीवन प्रमाणपत्र जमा करावे लागते. ऑफलाइन पद्धतीने लाइफ सर्टिफिकेट जमा करण्याचा कालावधी १ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबरपर्यंत आहे. मात्र आता काळजीचे कारण नाही, ऑनलाइन माध्यमातून तुम्ही कधीही लाइफ सर्टिफिकेट जमा करू शकता.

लाइफ सर्टिफिकेट म्हणजे पेन्शनधारक जिवंत असल्याचा पुरावा असतो. पेन्शनधारकांना बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये  जाऊन हे सर्टिफिकेट जमा करावे लागते. मात्र आता कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने ज्येष्ठ नागरिकांना घरबसल्याच हे सर्टिफिकेट जमा करता यावे यासाठी ऑनलाइन सेवा उपलब्ध करून दिली आहे.

वाचा कसे जमा कराल जीवन प्रमाणपत्र…
जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी एसबीआयच्या  https://www.pensionseva.sbi/  या वेबसाइटवर जाऊन तुमचा युजर आयडी बनवा आणि लॉग इन करा. यानंतर पेन्शन अकाउंट नंबरही भरा, तसेच जन्मतारिख आणि शाखा क्रमांक टाका. ज्या बँक शाखेत तुमचे पेन्शन येते त्याच शाखेचा क्रमांक तुम्हाला टाकावा लागेल. त्यानंतर मेल आयडी देखील द्या.

यानंतर पासवर्ड टाकून तुम्ही अकाउंट क्रिएट करू शकता. पुढे रजिस्ट्रेशननंतर पेन्शनधारकाच्या मेल आयडीवर मेल येईल. यामध्ये खाते सक्रीय करण्यासाठी एक लिंक दिलेली असेल. त्यावर क्लिक केल्यानंतर खाते Activate होईल. तसेच ईमेल आणि पासवर्ड टाकून वेबसाइटवर लॉग इन करा. याठिकाणी पेन्शन आणि खात्यासंबंधित माहिती येईल. अशा प्रकारे तुम्ही जीवन प्रमाणपत्र जमा करू शकता.

 

महत्त्वाच्या बातम्या
…तर साष्टांग नमस्कार घालण्याचीही माझी तयारी; मराठा आरक्षणासाठी उदयनराजे मैदानात
BCG vaccine : कोरोनावर ‘ही’ लस ठरतीये परिणामकारक, श्वसनाच्या त्रासावर उपयुक्त
आता Whtasapp वरूनही पाठवता येणार पैसे; जाणून घ्या सविस्तर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.