पंढरपुरच्या निवडणूकीचे हादरे नांदेडपर्यंत; तीनवेळा आमदार झालेला शिवसेना नेता भाजपच्या वाटेवर

नुकताच पंढरपुर विधानसभा पोटनिवडणूकीचा निकाल जाहीर झाला आहे. या निकालानंतर महाविकास आघाडीमध्ये एकच खळबळ उडाली आहे. आता नांदेडमधील शिवसेनेचा दिग्गज नेता भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली आहे.

नांदेडमधील शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. नांदेडमधील पोटनिवडणूकीचे तिकिट न दिल्यास भाजपचा झेंडा हाती धरण्याचा अप्रत्यक्ष इशारा साबणे यांनी शिवसेनेला दिला आहे.

नांदेडमधील देगलूर मतदारसंघातील काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापुरकर यांचे गेल्या महिन्यात कोरोनामुळे निधन झाले आहे. त्यामुळे आता रिक्त जागेसाठी पोटनिवडणूका होणार आहे. अशावेळी काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक चव्हाण यांनी रावसाहेब अंतापुरकर यांच्या मुलाला पोटनिवडणूकीसाठी तयारी करण्यास सांगितले आहे.

असे असताना या मतदार संघातून आमदार सुभाष साबणे यांनी या प्रसंगी उमेदवारी मिळवण्यासाठी भाजपात जायची तयारी दर्शवली आहे. तसेच पंढरपुरची पुनरावृत्ती टाळायची असेल. तर आपल्याला शिवसेनेने उमेदवारी द्यावी, अशी मागणी सुभाष साबणे यांनी केली आहे.

सुभाष साबणे हे शिवसेनेचे खुप जुने नेते आहे. ते तीनवेळा विधासभेवर निवडून आले आहे. १९९९ ते २००९ या काळात ते मुखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. २०१४ मध्ये देगलूर विधानसभा मतदार संघातून निवडून आले होते. मात्र २०१९ मध्ये रावसाहेब अंतापुरकर यांनी सुभाष साबणे यांचा पराभव केला होता.

महत्वाच्या बातम्या-

लसीकरणाचं टेंशन मिटलं; रशियाच्या ‘या’ नव्या लशीचा एक डोस घेतला तरी काम फत्ते होतय
साताऱ्यात राडा! मराठा आंदोलकांनी मंत्र्याच्या घरावर फेकले शेण, काँग्रेस राष्ट्रवादीच्या, कार्यालयावर दगडफेक
मराठा आंदोलनाचा भडका! मंत्री शंभूराज देसाईंच्या घरावर फेकले शेण, कार्यालयही फोडले

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.