अहमदनगरमध्ये उडाली खळबळ! जलसंधारण मंत्र्याच्या घरी सापडला मृतदेह

ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सून आणि जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे बंधू प्रशांत गडाख यांच्या पत्नी गौरी प्रशांत गडाख यांचा मृतदेह राहत्या घरी (अहमदनगर) आढळून आला आहे. गौरी प्रशांत गडाख यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. शनिवारी रात्री उशीरा ही घटना उघडकीस आली.

गौरी प्रशांत गडाख यांनी राहत्या घरी गळफास घेतला आहे. गौरी यांना स्थानिक रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यानंतर, रुग्णालय प्रशासनाने तोफखाना पोलीस ठाण्याला माहिती दिली. त्यानंतर, पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरू आहे.

गौरी थेट राजकारणात सक्रिय नसल्या तरी पती यशवंत यांनी स्थापन केलेल्या यशवंत सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून गौरी यांचा समाजकार्यात सहभाग होता. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. गाैरी यांचे माहेर लोणी (ता. राहाता) येथील विखे कुटुंबियांत आहे. काल माहेरच्या मंडळींनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता, शवविच्छेदनानंतरच मृत्यूचे कारण उघड होणार आहे.

महाराष्ट्रातच्या राजकारणातले जेष्ठ नेते यशवंतराव गडाख आणि जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या घरात सुनेचा मृतदेह सापडल्याने अहमदनगरमध्ये खळबळ उडाली आहे.

गौरी यांनी शनिवारी दुपारी एकच्या सुमारास आत्महत्या केल्याचे कळते, माहेरच्या नातेवाईकांनी घटना दुपारी होऊनही संध्याकाळ पर्यंत आम्हाला का कळवले नाही असा प्रश्न उपस्थित केला आहे.

सीरम इंस्टीट्यूटमध्ये तीन कोटी कोरोना लशी तयार; ‘या’ दिवशी येणार बाजारात 

फटाक्यांवरील बंदीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा

आयुष्यभर ब्रम्हचारी राहीलेल्या पत्रकाराने ६५ व्या वर्षी लग्न केले; कारण ऐकून डोळ्यांत पाणीच येईल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.