महाराष्ट्रातील(Maharshtra) विविध ठिकाणी विद्यार्थ्यांनी आंदोलन केल्यानंतर त्यांना चिथावणी दिल्याच्या आरोपाखाली विकास पाठक उर्फ हिंदुस्थानी भाऊला(Hindusthani Bhau) पोलिसांनी अटक केली होती. न्यायालयाने(Court) हिंदुस्थानी भाऊला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. यानंतर हिंदुस्थानी भाऊला दहावीच्या विद्यार्थ्यांचे पालक भेटले होते.(student parents angry on hindusthani bhau)
यावेळी विद्यार्थ्यांच्या पालकांनी पोलिसांसमोरच हिंदुस्थानी भाऊला झापले होते. पालक बोलत असताना हिंदुस्थानी भाऊ त्यांचे म्हणणे ऐकत होता. काही पालकांनी हिंदुस्थानी भाऊला त्याच्या शिक्षणाबद्दल विचारले. “तू सातवी शिकलेला आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना काय सल्ले देतो, परीक्षा घेऊ नका, देऊ नका, ऑनलाइन परीक्षा घ्या, काही कळते का तुला?” अशा शब्दांत पालक हिंदुस्थानी भाऊवर संतापले.
विद्यार्थ्यांचे पालक हिंदुस्थानी भाऊला म्हणाले की, “आमच्या मुलांचं भवितव्य घडवण्यासाठी आम्ही काय करतो आणि तू त्यांना काय सल्ले देतो, मुलांचा लिहिण्याचा स्पीड कमी झाला आहे, असे तू म्हणतो आहेस. पण कोरोना काळात जर एखादा विद्यार्थी २ वर्षापासून पबजी खेळत असेल तर त्याला कुठून स्पीड येणार.”
“ज्या मुलांनी कागदावर काही लिहू शकली नाहीत, ते ऑनलाइन परीक्षा देताना कॉम्प्युटरवर टायपिंग तरी कसं करतील, ते देखील देवनागरीत”, असे पालक हिंदुस्थानी भाऊला म्हणाले आहेत. पालकांनी पोलिसांसमोरच हिंदुस्थानी भाऊला झापले आहे. यावेळी हिंदुस्थानी भाऊला रागाने चांगलाच लाल झाला होता.
काही दिवसांपूर्वीच शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांनी दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाइन घेण्यात येतील, असे जाहीर केल्यानंतर ठरावीक वर्गातून या निर्णयाला विरोध होऊ लागला. समाजमाध्यमांवर अर्वाच्च भाषेतील मजकूर प्रसारित करणारा ‘हिंदूुस्थानी भाऊ’ विकास पाठक यानेही शिक्षणमंत्र्यांच्या या निर्णयाला विरोध केला.
हिंदुस्थानी भाऊला अटक केल्यानंतर भाजपाने ठाकरे सरकारवर निशाणा साधला होता. हिंदुस्थानी भाऊची सुटका झाली पाहिजे, आम्ही सगळे त्याच्या सोबत आहोत. जर त्यांची सुटका नाही झाली तर आम्ही आंदोलन करू, असा इशारा भाजप पक्षाचे माजी पदाधिकारी मोहित कंबोज यांनी राज्य सरकारला दिला होता.
महत्वाच्या बातम्या :-
‘… तर मी अजित पवारांविरोधात चंद्रकांत पाटलांच्या बाजूने उभा राहीन’, एकनाथ खडसेंचे खळबळजनक विधान
१ लाखाची लाच घेताना पकडलं तरी महिला अधिकाऱ्याचे हसू थांबेना; म्हणाली, प्रसादाला नाही कसं म्हणू
मेळाव्यात चंद्रकांत पाटील म्हणले, ‘राज्यात १० मार्चनंतर भाजप सरकार’, बाहेर येताच पलटी मारत केली सारवासारव