काल महाराष्ट्र बोर्डचा दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. महाराष्ट्र्राचा निकाल ९६.९४ टक्के लागला आहे. दहावीच्या परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांनी चांगले गुण मिळवले आहेत. यादरम्यान अतिशय हलाखीच्या परिस्थितीत संघर्ष करत दहावीच्या परीक्षेत उत्तुंग यश मिळवल्याचा अनेक प्रेरणादायी उदाहरणे पाहायला मिळत आहेत.(student get 92 % in 10th exam mla gopichand padalkar congratulate)
असंच एक उदाहरण सांगली जिल्ह्यातून समोर आलं आहे. सांगली जिल्ह्यातील शेंडगेवाडी गावातील एका विद्यार्थ्याने मेंढ्या चारून अभ्यास करत दहावीच्या परीक्षेत ९२ टक्के गुण मिळवले आहेत. या विद्यार्थ्याचे नाव हेमंत बीरा मुढे(Hemant Berra Mudha) असे आहे. हेमंत दररोज शाळेसाठी ५ किमीचा प्रवास करायचा. हेमंतचे वडील मेंढपाळ आहेत.
हेमंत शाळासोबतच वडिलांना मेंढ्या चारण्यात मदत करायचा. खूप संघर्ष करत हेमंतने हे यश मिळवले आहे. दहावीच्या परीक्षेत मिळवलेल्या यशाबद्दल अनेकांनी हेमंतचे कौतुक केले आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी देखील हेमंतचे कौतुक केले आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे.
त्या ट्विटमध्ये भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी लिहिले आहे की, “शाळेसाठी शेंडगेवाडी ते कामथ रोजचा ५ किमीचा खडकांनी भरलेला प्रवास.नंतर मेंढ्या चारण्यात बापाला मदत करायची,अभ्यास करायचा.अशा संघर्षातून हेमंत बीरा मुढे या मेंढपाळ पुत्रानं दहावीला ९२ टक्के मिळवलेत. तुझ्या कपाळी भंडारा राहू दे, बा बिरोबाचं बळ तुझ्या आयुष्यात नक्की सोबत राहिल.”
https://twitter.com/GopichandP_MLC/status/1538063880387055618?s=20&t=vmLRi3x6i9Bj465-aEoB3A
पुण्यातील धायरी परिसरातील पायलकुमारी नावाच्या मुलीने अतिशय हलाखीच्या परिस्थितीत अभ्यास करत दहावीच्या परीक्षेत ९२ टक्के गुण मिळवले आहेत. पायलकुमारीचे वडील एका हॉटेलमध्ये वेटरचे काम करतात. तर आई इतरांच्या घरी धुणीभांडी करते. पायलकुमारीचा तिच्या शाळेत पहिला क्रमांक आला आहे.
तसेच पुण्यातील एका विद्यार्थ्याने सर्व विषयात ३५-३५ गुण मिळवले आहेत. या विद्यार्थ्याची सध्या जोरदार चर्चा होत आहे. या विद्यार्थ्याचे नाव शुभम जाधव असे आहे. या पठ्ठ्याने सहाही विषयात ३५ गुण मिळवले आहेत. शुभम जाधवचा परिसरातील लोकांनी सत्कार केला आहे. शुभम जाधवच्या कुटूंबियांनी मुलाच्या कामगिरीवर आनंद व्यक्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या :-
१०८ सूर्यनमस्कार केले तरीही दमली नाही प्राजक्ता; व्हिडिओ शेअर करत म्हणाली, ‘तुम्ही…’
तारक मेहता का उलटा चष्मामध्ये नवीन दयाबेनची एन्ट्री, ‘ही’ अभिनेत्री साकारणार भूमिका, पहा फोटो
दारूच्या नशेत पत्नीचा केला खून नंतर गेला विसरून, मृतदेहासोबतच झोपला, सकाळी उठला अन्…