पाच महिन्यांच्या मुलीसाठी आई-वडिलांची धडपड, 16 कोटींच्या इंजेक्शनसाठी क्राउड फंडिंग

मुंबई | ‘तीरा’ नावातच एक वेगळेपण आहे. या  गोंडस चिमुकलीला असलेला आजारही दुर्मिळ आहे.  तीराला SMA Type 1 हा आजार असल्याचे निदान झाल आहे. या आजारवर भारतात औषध नाही. परंतु अमेरिकेत या आजारावर औषध आहे. त्यावरील इंजेक्शनसाठी तब्बल १६ कोटी रुपयांचा खर्च येणार होता. यासाठी मिहिर कामत आणि प्रियांका कामत या तीराच्या पालकांनी क्राऊड फंडिंगचा आधार घेण्याचे ठरवले. ते या उपक्रमात यशस्वी झाले आहेत.

सध्या तीराची प्रकृती पाहता तिला अमेरिकेत नेऊन उपचार करणे शक्य नाही. या आजारावर उपलब्ध असलेले इंजेक्शन भारतात आणण्याचा निर्णय वडिल मिहिर आणि आई प्रियांका यांनी घेतला. पण १६ कोटी रुपये एवढी मोठी रक्कम कशी जुळवायची हा प्रश्न त्यांच्या पुढे होता.

‘’उभ्या आयुष्यात आपण कधी १६ कोटी रुपये पाहिले नाहीत. परंतु आता सुरुवात केली पाहिजे असं ठरवलं. एका व्यक्तीला क्राऊड फंडिंव्दारे पैसे जमा करताना पाहून आपणदेखील असं करु शकतो असा विश्वास निर्माण झाला’’ असं मिहिर सांगतात.

त्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर तीराला असलेल्या आजाराविषयी माहिती शेअर केली. तसेच त्यांनी फाईट्स एसएमए असं इन्स्टाग्राम आणि फेसबुक पेजही तयार केलं. यानंतर त्यांच्याकडे सर्व स्तरातून मदतीचे हाथ पुढे येऊ लागले. अनेक लोकांच्या मदतीने आणि कामत कुटुंबीयांच्या प्रयत्नांमुळे १६ कोटी रुपये जमवण्यात यश आले आहे.

आता हे इंजक्शन जीवन रक्षक औषधांच्या यादीत ठेवले गेले नसल्यास कुटुंबाला यावर कर भरायला लागू शकतो. जीएसटी एम्पोर्ट ड्यूटू भरावी लागल्यास ती ३५ टक्क्यांच्या जवळपास असेल. ती रक्कम साडेपाच कोटी इतकी होते. याबद्दल ‘आता सरकारनं आम्हाला काही सवलत दिली तर आमच्यासह आणखी काही कुटुंबांना मदत होईल’.  असं मिहिर कामत यांनी सांगितले आहे.

आता पुढील प्रक्रियेसाठी तीराच्या कुटुंबीयांना सरकारची मदत हवी आहे. लोकांच्या या भरघोस प्रतिसादानंतर सरकारनेही काही हालचाली करण्याची गरज आहे. राज्यातील ठाकरे आणि केंद्रातील मोदी सरकारने वेळीच लक्ष घालायला हवे. चांगल्या रिझल्टसाठी तीराला फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत इंजक्शन द्यावचं लागणार असल्याचे सांगितले जात आहे.

महत्वाच्या बातम्या-
२०१९ ची विधानसभा निवडणूक फिक्स होती! काॅंग्रेस, भाजप, शिवसेना तिघांची मिलीभगत झाली उघड
आंदोलन चिघळवणाऱ्या भाजपच्या दीप सिंधुला शेतकऱ्यांनी पळवून लावले; पहा व्हिडीओ
आनंद दिघे: जिल्ह्याप्रमुख पदावर असूनही कार्यालयात राहून कार्यकर्त्यांनी आणलेले डबे प्रेमाने खाणारा नेता

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.