मुंबईत लोकल प्रवासावर निर्बंध? धार्मिक स्थळे, माॅल बंद होणार; महापौरांनी दिले संकेत…

मुंबई : राज्यात करोना परिस्थिती दिवसागणिक चिंताजनक होत चालली आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने राज्यात अंशत: लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय एक-दोन दिवसांत होऊ शकतो.

त्यानुसार ज्या शहरांमध्ये रुग्णसंख्या वाढली आहे, त्या ठिकाणी मॉल, सिनेमागृह, नाट्यगृह आणि खासगी आस्थापना बंद ठेवण्याचा निर्णय होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मुंबई एकाच दिवसात ८ हजार ६४६ नवीन रुग्ण आढळून आले आहेत.

अचानक रुग्णसंख्येत वाढ झाल्याने प्रशासन सर्तक झाले असून, महापौर किशोरी पेडणेकर यांनी मोठे निर्बंध लावण्याचे संकेत दिले आहेत. मुंबईत रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे, मुंबईची लाइफलाइन समजली जाणारी लोकल फक्त अत्यावश्यक सेवेसाठी व शासकीय कर्मचाऱ्यांसाठी सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.

दरम्यान, करोना संक्रमणाचा वेग रोखण्यासाठी काही कडक निर्बंध लागू केले जाऊ शकतात, असेही महापौरांनी म्हटले आहे. रेस्तराँ ५० टक्के क्षमतेनं सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. त्याचबरोबर लोक जर योग्य प्रतिसाद देत नसतील, तर धार्मिक प्रार्थनास्थळेही बंद करण्यात येतील,” असे महापौर म्हणाल्या.

तसेच मुंबईमधील रुग्णालयांमध्ये बेड्स किती उपलब्ध आहेत, याबद्दल सुद्धा पेडणेकर यांनी माहिती दिली. मुंबईत सध्या १६,५६१ एकूण बेड आहेत. त्यापैकी १२,६२८ बेड भरले आहेत तर ३,९३३ रिकामे आहेत. मुंबईत १,६२७ आयसीयु बेड आहेत त्यापैकी १,३०३ वापरात आहेत तर ३२४ बेड शिल्लक आहेत.

महत्त्वाच्या बातम्या 

जीव वाचवायचा तर लॉकडाऊन करणे भाग आहे; टोपेंनी दिले १५ दिवसांच्या लॉकडाऊनचे संकेत

दिपाली चव्हाणाच्या आत्महत्या प्रकरणावर प्रकाश आंबेडकर यांनी केला खळबळजनक गौप्यस्फोट; म्हणाले…

बाॅलीवूड पुन्हा हादरले! भाजपची खासदार असलेल्या प्रसिद्ध अभिनेत्रीला झाला ब्लड कॅन्सर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.