नाही नाही म्हणत अखेर मुख्यमंत्र्यांनी तो निर्णय घेतलाच; कोरोना रोखण्यासाठी रविवारपासून संपूर्ण राज्यात रात्रीची जमावबंदी

मुंबई : राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानं मुख्यमंत्री ठाकरेंनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात रविवारी (दिनांक २८ )  रात्रीपासून जमावबंदी लावण्याच्या सूचना मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिल्या आहेत.

कोरोना रुग्णांची वाढलेली संख्या लक्षात घेता गर्दी टाळणे, वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी काही कडक उपाययोजना लागू करणे आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे नाईलाजाने गरजेचे ठरत असल्याने संपूर्ण रविवारी रात्रीपासून जमावबंदी लावण्याच्या सूचना मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिल्या.

तसेच मॉल्स, बार, हॉटेल्स, सिनेमागृहे अशा गर्दीच्या ठिकाणी त्यांना घालून दिलेल्या एस.ओ.पीची अंमलबजावणी होत नसल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. रात्री आठ ते सकाळी सात या वेळेत ते बंद राहतील याची काळजी घ्यावी, गर्दी होणार नाही हे पहावे, सामाजिक राजकीय आणि सांस्कृतिक कार्यक्रमावर घातलेली बंधने पाळावीत अशा सुचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

दरम्यान, मुख्यमंत्री म्हणाले की, मला लॉकडाऊन लावण्याची अजिबात इच्छा नाही. परंतु वाढती रुग्णसंख्या विचारात घेता, आपण ज्या आरोग्य सुविधांची मोठ्या प्रमाणात राज्यभर उभारणी केली, त्या सुविधाही कमी पडतील की काय अशी शक्यता निर्माण होताना दिसत आहे.

हीच बाब लक्षात घेऊन प्रत्येक जिल्ह्यांनी त्यांच्या आरोग्य सुविधा, बेड्स व औषधांची उपलब्धता आणि त्यात करावयाची वाढ याकडे लक्ष केंद्रीत करावे अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

महत्त्वाच्या बातम्या 

दीपाली चव्हाण आत्महत्या! रात्री-बेरात्री बोलावून एकटेपणाचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न…

“होय कट मीच रचला होता”, अखेर सचिन वाझेनी दिली कबुली; सांगितले ‘हे’ धक्कादायक कारण

बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी मी सत्याग्रह केला होता; मला अटकही झाली होती – नरेंद्र मोदी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.