कडक! महेंद्रसिंगच्या नव्या लूकनं सोशल मीडियावर लावली आग; फोटो तुफान व्हायरल

मुंबई। भारतीय संघाचे अनेक खेळाडू हे कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे कायम चर्चेत असतात. भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा कॅप्टन कूल या नावाने ओळखला जातो. धोनीचा आतापर्यंत करोडो चाहतावर्ग आहे. त्याला एक कूल आणि भारतातील सर्वात यशस्वी कर्णधार मानलं जातं.

धोनीची पत्नी साक्षी धोनी नेहमी त्याचे व्हिडिओ किंवा फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट करत असते. त्यामुळे क्रिकेट मैदानापासून दूर असला तरीही धोनी नेहमी चर्चेत असतो. असच यावेळी देखील महेंद्र सिंग धोनी चर्चेत आला आहे. मात्र त्यामागचे कारण धोनीचा नवीन लुक आहे. सोशल मीडियावर नुकताच धोनीचा नवा लूक व्हायरल होत आहे.

जो पाहून अनेक चाहत्यांची झोप उडाली आहे. मुख्य म्हणजे हा लूक त्याला अतिशय सुरेख पद्धतीनं शोभून दिसत आहे. त्याच्या या नव्या लूकवरुन पडदा उठताच सोशल मीडियावर धोनीच्या नावाचा ट्रेंड पाहायला मिळाला होता.

सेलिब्रिटी हेअरस्टायलिस्ट आलिम हकिम यानं त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटच्या माध्यमातून माहिचे काही फोटो शेअर केले. ‘हा पाहा माहिचा डॅशिंग लूक. त्याचा हेअरकट (haircut) आणि बिअर्ड करताना मजा आली….’, असं आलिम हकिमनं लिहिलं आहे.

महेंद्रसिंग धोनीने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीदरम्यान मैदानावरील खेळी सोबतच नवनवीन हेअर स्टाईलसाठीही नेहमीच चर्चेत राहिला आहे. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या दिवसात त्याने लांब तपकिरी केस ठेवलेले असो किंवा विश्वचषक विजयानंतर अचानक मुंडले केलेले पाहिले आहे.

धोनीने नेहमीच त्याच्या चाहत्यांना लूकच्या बाबतीत आश्चर्यचकित केले आहे. आता महेंद्रसिंग धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरीही तो त्याच्या नवीन लूकमध्ये दिसून येतो. ज्या प्रमाणे धोनी कायम चर्चेत असतो त्याचबरोबर त्याच संपुर्ण कुटूंबादेखील कायम चर्चेत असते.
महत्वाच्या बातम्या
जया प्रदाला एकदा चालू ट्रेनमध्येच करावी लागली होती अंघोळ, कारण…; जया प्रदाने सांगितला ‘तो’ किस्सा
‘मी पॅकेज घोषित करणारा मुख्यमंत्री नाही, मदत करणारा मुख्यमंत्री आहे’ – उद्धव ठाकरे
काय सांगता! ‘या’ शेतकऱ्याने लावले शेतात सनी लिओनीचे पोस्टर, कारण ऐकून वाटेल नवल
बाबो! प्रसिद्ध मॉडेलने केलं खळबळजनक विधान; म्हणाली पतीला सेक्स करण्यास कधी मनाई करू नये नाहीतर…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.