शुक्रवारी रात्रीपासून सोमवार सकाळपर्यंत कडक लॉकडाऊन; ठाकरे सरकारने घेतला मोठा निर्णय

मुंबई: कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यात संपूर्णपणे नसला तरी अंशत: लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. राज्यात विकेंड लॉकडाऊन जाहीर करण्यात आला असून शनिवार आणि रविवारी संपूर्ण राज्यात कडकडीत बंद राहणार असल्याची माहिती राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीची बैठक बोलावून लॉकडाऊनबाबत चर्चा केली. राज्यात उद्यापासून कडक नियम लागू होणार असून, रात्री ८ वाजेपासून सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी असणार असून, दिवसा १४४ कलम लागू (जमावबंदी) असेल, असे मलिक यांनी सांगितले.

उद्या सायंकाळी ८ वाजल्यापासून नियमावली लागू होईल. उद्योग व्यवसायांना कंपनीच्या वेळा ठरविण्यात येणार आहेत. सिनेमागृहे, नाट्यगृह बंद राहणार आहेत. याबाबत आजच्या बैठकीत राज्यात करोनाचं संक्रमण रोखण्यासाठी कठोर निर्बंध घालण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.

दरम्यान, या बैठकीत मॉल्स, हॉटेल, बार बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. होम डिलिव्हरी आणि अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. शासकीय कार्यालये ५० टक्के क्षमतेनं सुरू राहतील. उद्योग संपूर्ण क्षमतेनं सुरू राहणार असून, कामगारांवर बंधनं नसतील.

जिथे कामगारांना राहण्याची व्यवस्था असलेली बांधकामं सुरू राहतील. मंडईत निर्बंध नसतील, पण गर्दी कमी करण्यासाठी नियम करण्यात आले आहेत. महत्त्वाचं म्हणजे शुक्रवारी रात्री ८ ते सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत महाराष्ट्रात संपूर्ण लॉकडाउन असेल. हा निर्णय मंत्रिमंडळाने एकमताने घेतला आहे,” असे मलिक यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या 

आता कोरोना लसीकरण केंद्रावर पाहायला मिळणार ‘नथीचा नखरा’; वाचा काय आहे प्रकार..

मुख्यमंत्र्यांच्या सहकार्याच्या विनंतीनंतर राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना केले ‘हे’ आवाहन

परीस्थीती गंभीर, लाॅकडाऊन करावा लागेल, सहकार्य करा; मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरे, फडणवीसांना फोन

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.