मोठी बातमी! राज्यातील ‘या’ जिल्ह्यात कडक लॉकडाऊन जाहीर

औरंगाबाद | राज्यात पुन्हा कोरोना विषाणूने डोकं वर काढलं आहे. अनलॉक फेजमध्ये नागरिकांनी कुठलीही काळजी न घेतल्याने आणि शाळा, हॉटेल, लग्न, समारंभ यातून जास्त लागण नागरिकांना झाल्याचे दिसून येत आहे. कोरोनाची परिस्थिती पाहता औरंगाबाद जिल्ह्यातील प्रशासनाने कठोर पावलं उचलली आहेत आणि पुन्हा नवे निर्बंध लागू केले आहेत.

औरंगाबाद जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी जिल्ह्यातील पर्यटनस्थळे 4 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच शहरातील दुकाने दोन दिवस बंद करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे.

दुकान सुरू ठेवायचं असेल तर कोरोना चाचणी, मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग पाळून, दूकानात गर्दी न करता दूकाने उघडावीत. लॉकडाऊनमध्ये प्रशासनाच्या नियमांचे पालन केले नाही, तर गून्हे दाखल करण्यात येतील असंही जिल्हाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे.

दरम्यान महापालिका कर्मचारी, जिल्हाधिकारी, आरोग्य विभाग, पोलिस आयुक्त यांनी शहरात मास्क न लावणाऱ्यांवर, विनाकारण गर्दी करणाऱ्यांवर दंडाची कारवाई केली आहे. कारवाईच्या भीतीने लोकांची संख्या तुरळक पाहायला मिळाली.

राज्यातील पुणे, मुंबई, औरंगाबाद, ठाणे, अमरावती, नाशिक, जळगाव, नागपुर या जिल्ह्यात कोरोनाच्या रूग्णसंख्येमध्ये वाढ झाली आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी नागरिकांनी नियम पाळले नाही, तर अनेक ठिकानी लॉकडाऊन करण्याचा इशारा दिला आहे.

महत्वाच्या बातम्या-
…आणि तिनेच मला चपलीने मारले, त्या झोमॅटो डिलीव्हरी बॉयचा अजब खुलासा
पुणेकरांचा नादच नाय! पुण्याचा हा चार वर्षांचा चिमुकला महिन्याला कमावतो दिड लाख रूपये
चाहत्यांनी तैमूरला दिला आवाज, अन् त्याने जे केले ते पाहून करीना चांगलीच संतापली, पाहा व्हिडिओ
कोरोना लस घेण्याबाबत रतन टाटांनी भारतीय नागरीकांना केले ‘हे’ आवाहन

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.