अमरावती | अमरावती विभागात कोरोना रुग्णसंखेत गेल्या काही दिवसांपासून झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे अमरावतीमध्ये पुढील एका आठवड्यासाठी पुन्हा एकदा लॉकडाऊन जाहीर केला आहे. शुक्रवारी रात्री ८ वाजल्यापासून लॉकडाऊन सुरुवात झाली आहे.
केंद्र सरकारने कोरोना लसीकरणाला सुरूवात केली आहे. अशात राज्यात कोरोनाने पुन्हा एकदा डोक वर काढले आहे. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातील कोरोना लसीकरणाचा कार्यक्रम सुरू आहे. मात्र अमरावतीसह काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या हळूहळू वाढत आहे.
अमरावतीत केलेला लॉकडाऊन सोमवारी ८ वाजेपर्यंत करण्यात आला होता. मात्र पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे लॉकडाऊन वाढवला आहे. हा सोमवारी रात्री आठ वाजल्यापासून लॉकडाऊन करण्यात येणार आहे. हा पुढील एका आठवड्यापर्यंत असणार आहे.
शनिवारी एका दिवासतच एक हजाराहून अधिक कोरोनाच्या रुग्नांची नोंद अमरावतीत झाली. इतर मोठ्या लोकसंख्येच्या तुलनेत अमरावती लहान विभाग आहे. परंतु तेथील रूग्णसंख्या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे की कोरोना वेगाने पसरत आहे.
कोविड १९ च्या प्रतिबंधात्मक उपाययोजनचे सुधारित निर्देश
दुकाने सकाळी ९ ते ५ पर्यंत सूरू राहतील.
हॉटेल प्रत्यक्ष सुरू राहणार नाहीत तर पार्सल सुविधेसाठी परवानगी आहे.
लग्नसमारंभासाठी वधू-वरासहीत २५ व्यक्तींना परवानगी देण्यात आली आहे.
धार्मिक स्थळांच्या ठिकाणी दहा व्यक्तीची मर्यांदा ठेवली आहे.
शाळा महाविद्यालय, शैक्षणिक प्रशिक्षण केंद्रे, खाजगी शिकवणी वर्ग बंद राहतील.
अमरावती विभागातील ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये संचारबंदीच्या कालावधीत सर्व प्रकारची सिनेमागृहे, व्यायामशाळा, जलतरण तलाव, मनोरंजन उद्याने, नाट्यगृहे ही ठिकाणे बंद राहतील.
महत्त्वाच्या बातम्या-
ब्रेकिंग न्युज! पुण्यात उद्यापासून पुन्हा कडक निर्बंध, वाचा काय सुरू आणि काय बंद राहणार
औरंगाबादेत करोना लस घेतलेले दोन डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह; आरोग्य यंत्रणेची उडाली झोप
शेतकरी कामगार पक्ष मुळशी तालुक्याच्या वतीने शिवजयंती साजरी
रिअल हिरो! सैनिकांचा थंडीपासून बचाव होण्यासाठी रॅंचोने बनवलं अनोखं टेंट